नववर्षाच्या सुरुवातीला, दिल्लीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नववर्षाच्या सुरुवातीला, दिल्लीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संपूर्ण जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत नव्या 2023 वर्षाचं सेलिब्रेशन सुरु असताना आज पहाटे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. वर्षाच्या पहिल्याचं दिवशी जाणवलेल्या भूंकपामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मध्यरात्री 1 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या इज्जर येथे भूकंपाचं केंद्र होते.

या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली, तसेच त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर आत होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

अचानक जाणवलेल्या या भूंकपाचे धक्क्यामुळे अनेकांनी घरातून आणि हॉटेलमधून पळ काढत रस्त्यावर धाव घेतली. काही काळ हे नागरिक बाहेरचं थांबले, मात्र भूकंपाचा धोका टळल्याचे लक्षात येताच नागरिक पुन्हा आपल्या घरी आणि हॉटेलात गेले.

त्यानंतर काही काळ हे नागरिक बाहेरच थांबले होते. मात्र, भूकंपाचा धोका टळल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा नागरीक आपल्या घरात आणि हॉटेलात गेले. 2023 या नवं वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असताना अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरिक दहशतीखाली होते. कारण दिल्लीत देखील अनेक पर्यटक न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी आले आहेत. अनेकांनी ट्विटवरही दिल्लीतील भूकंपाची विचारणा केली आहे.

नोव्हेंबर 2022 मध्येही दिल्लीत दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. यात 12 नोव्हेबर रोजी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि बिजनौरला भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे दिल्लीतील या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये एक भीती निर्माण होत आहे.


Happy New Year 2023 : नवा उत्साह, नवा जल्लोष; मुंबईसह देशभरात नव्या वर्षाचं स्वागत

First Published on: January 1, 2023 8:56 AM
Exit mobile version