Happy New Year 2023 : नवा उत्साह, नवा जल्लोष; मुंबईसह देशभरात नव्या वर्षाचं स्वागत

Happy New Year 2023 new year celebration in india mumbai pune maharashtrasydney auckland and all over the world welcome 2023

नव्या उत्साहात, नव्या जल्लोषात मुंबईसह जगभरात नवीन वर्षाचं धुमडाक्यात स्वागत करण्यातं आलं. 31 डिसेंबरच्या रात्री घड्याळ्याच्या काट्याने बाराचा ठोका देताच देशभरात फटाक्यांच्या आतषबाजीने भारतीयांनी सरत्या 2022 या वर्षाला गुडबाय करत निरोप दिला. अगदी जम्मू काश्मीर पासून महाराष्ट्र, पश्चिम बंगालपर्यंत संपूर्ण देशात नव्या वर्षाच अगदी जल्लोषात आणि दिमाखात स्वागत करण्यात आलं, नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन लाईन, जुहू चौपाटी, दादर चौपाटी, वांद्रे बँड स्टँड, गेट वे ऑफ इंडिया या पर्यटनस्थळांवर मुंबईकरांनी गर्दी केली होती, यासह अनेक भक्तांनी सिद्धीविनायक, शिर्डीतील साई मंदिर, एकवीरा आई, पुण्यातील दगडूशेठ हवाई, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर या प्रसिद्ध देवस्थानी जाऊन सरत्या 2022 या वर्षाला निरोप देत 2023 या नवं वर्षासाठी देवाकडे साकडं घातलं. अनेक नव्या संकल्पाना केल्या.

यात मुंबई, पुणे, दिल्ली, गोवा, कोलकत्ता, चेन्नईसह देशभरातील सर्वचं शहरं नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सजली होती. यात तरुणाईचा उत्साह वाखडण्याजोगा होता, अनेक ठिकाणी तरुणाईने डीजेच्या ठेक्यावर सरत्या 2022 वर्षाला गुड बाय केले. मुंबईसह जगभरात याचप्रकारे नवं वर्षाचं दिमाखदार स्वागत करण्यातं आलं. याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यतिरिक्त अनेकांनी 2022 या सरत्या वर्षांतील दु:ख विसरून नवीन वर्षाच्या काही नव्या संकल्पाना केल्या आहेत.

महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा जल्लोष

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यभरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. यात मुंबईत ठिकठिकाणी मुंबईकरांनी गर्दी केली होती. रात्री 12 वाजता मरीन ड्राईव्हमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह नागरिकांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

पर्यटन स्थळ हाऊसफुल्ल

लोणावळा, खंडाळा, कोकण, गोवा, मनाली, हिमाचलप्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थानसह देशभरातील अनेक पर्यटन स्थळ नव वर्षानिमित्त हाऊसफुल्ल झाल्याची पाहायला मिळत आहेत. कोरोनानंतर तब्बल 3 वर्षांनंतर नागरिकांना यंदा नवं वर्षाचा मनसोक्त आनंद घेता येत आहे.

जगभरात नवं वर्षाचं धूमधडाक्या स्वागत

सामोआ, टोंगा, किरिबाती, अमेरिका, लंडन, दुबई, कॅनडा, न्यूझीलंडसह अनेक देशांमध्ये नवं वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. भारतीय प्रमाणवेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे असलेल्या देशांमध्येही त्याच उत्साहात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जगभरातील न्यू-ईअर सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ, फोटो सध्या ट्वीटर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फटक्यांची आतषबाजी करत नागरिकांनी नव्या वर्षाचं स्वागत करत जल्लोष केला आहे. ऑकलंडमध्ये उंच टॉवरवरून फटाके फोडण्यात आले. यात न्यूझीलंडमधील ऑकलंडच्या स्काय टॉवरवर दरवर्षीप्रमाणे यंदाही डोळ्यांच पारणं फिटवणारी रोषणाई केली होती. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्यामोठ्या घड्याळामध्ये 12 वाजताच जोरदार आतषबाजी आणि सेलिब्रेशन सुरु झालं.

सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव

31 डिसेंबरपासूनच सोशल मीडियावर Welcome 2023, Happy 2023 आणि Good Bye 2022 हा ट्रेंड सुरु झाला. यात ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स आपल्या स्पेशल फ्रेंड्स, व्यक्तींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. काहींनी आपल्या आठवणींचा कोलाजही पोस्ट केलाय. तर काहींनी 2023 मधील संकल्प सांगितले आहेत. तर काही अद्याप न्यू इअर सेलिब्रेशनचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत आहेत.


हेही वाचा : ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दीड तास गुफ्तगू