दिल्लीत एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्लीत एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्लीत एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज पुन्हा एकदा दिल्लीतील एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये देखील सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र गुरुग्राम असल्याचे म्हटले जात आहे. ७ वाजून १ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. काही लोक भूकंपाचे धक्के तीव्र असल्याने घराच्या बाहेर आले होते. माहितीनुसार, यापूर्वी दिल्लीत ११ छोटे भूकंप झाले आहेत.

यापूर्वी गुरुवारी लडाखमधील कारगिल येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळी ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, दुपारी १.११ मिनिटांनी कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचे केंद्र कारगिलपासून ११९ किलोमीटर नॉर्थवेस्ट अंतरावर होते.

लडाखनंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपरी ०२.०२ मिनिटांनी झालेल्या हा भूकंप ३.६ रिश्टर स्केलचा होता. तसेच १ जुलै रोजी देखील जम्मू-काश्मीरमध्ये दोन भूकंपाचे तीव्र भूकंपाचे झटके बसले होते.


हेही वाचा – पाकिस्तानात रेल्वेची बसला धडक; भीषण अपघातात १९ शीख यात्रेकरुंचा मृत्यू


 

First Published on: July 3, 2020 7:59 PM
Exit mobile version