श्रीलंकेत आर्थिक संकट, मदतीसाठी ‘या’ देशांनी घेतला पुढाकार

श्रीलंकेत आर्थिक संकट, मदतीसाठी ‘या’ देशांनी घेतला पुढाकार

मागील काही दिवसांपासून श्रीलंकेत आर्थिक संकट निर्माण झालं असून नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. येथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरच ताबा मिळवला. तसेच देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याच्या निर्णयानंतर लगेचच निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देखील १३ जुलै रोजी राजीनामा देणार आहेत.

श्रीलंकेत सुरू असलेल्या या सर्व परिस्थितीवर अनेक देशांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, चीन आणि जपानचा समावेश आहे. भारत आणि श्रीलंका यांचे द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. काँग्रेस पक्ष या गंभीर संकटाच्या वेळी श्रीलंका आणि तेथील जनतेच्या पाठीशी उभा आहे, असं काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

चीन या देशाने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीनने आपल्या नागरिकांनी श्रीलंकेतील निदर्शनांमध्ये सहभागी होऊ नये. श्रीलंकेबद्दल आपल्याला सहानुभूती असल्याचे देखील चीनने म्हटले आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत श्रीलंकेला मदत करत राहील, असं चीनने म्हटलं आहे.

चीननंतर जपाननेही श्रीलंकेच्या मदतीचा हात दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत जपान श्रीलंकेला त्याच्या आर्थिक कार्यक्रमासाठी आणि देशाच्या विकास कार्यासाठी मदत करण्यास तयार आहे. परंतु आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असं जपानने म्हटले आहे.जनतेनं विरोध केल्याने श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी शनिवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.


हेही वाचा : नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल- पंतप्रधान मोदी


 

First Published on: July 10, 2022 7:27 PM
Exit mobile version