Election 2019 : तारखा जाहीर होताच, मोदींनी मागितले ‘आशिर्वाद’

Election 2019 : तारखा जाहीर होताच, मोदींनी मागितले ‘आशिर्वाद’

फाईल फोटो

रविवारी संध्याकाळी लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचं बिगूल वाजलं. देशातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यांमध्ये होणार असून, ११ एप्रिलला सुरु होऊन त्या १९ मे रोजी संपतील. त्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, काल निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक अनेक Twits केली. लागोपाठ केलेल्या या सर्व ट्वीट्समध्ये मोदींनी लोकसभा निवडणुकांविषयीच भाष्य केले आहे. त्यातील एका ट्वीटमध्ये मोदींनी म्हटलं आहे की, ‘लोकतंत्र निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. देशातील माझे बांधव २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग दाखवतील असा माझा विश्वास आहे. मला आशा आहे की ही निवडणुक एक ऐतिहासिक निवडणुक ठरेल. विशेषत: पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना मी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन करतो.’

मोदी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा. भलेही आपण विविध राजकीय पक्षांशी संबंधित असू पण आपला उद्देश एकच असायला हवा. तो म्हणजे भारत देशाचा विकास आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं सशक्तीकरण

मोदी म्हणाले की, ‘निवडणुक आयोगालादेखील शुभेच्छा. ते सर्व अधिकारी आणि सुरक्षाकर्मी जे भारताच्या सुरक्षेशी तसंच विकासाशी निगडीत आहे आणि त्यासाठी तैनात आहेत ते निवडणुकासांठीही सज्ज असतील.’

मोदी म्हणतात की, ‘२०१४ मध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात युपीए सरकारला नाकारलं. युपीए सरकारचा भ्रष्टाचार, जातीयवाद आणि पक्षघात या आणि अशा अनेक कारणांमुळे लोकांमध्ये कमालीचा राग होता. यामुळे भारताचा आत्मविश्वास कमी पडत होता आणि भारतीय नागरिकांना अशाप्रकारच्या निराशावादापासून सुटकारा हवा होता.

या आणि अशाप्रकारच्या अनेक ट्वीट्सद्वारे मोदींना भाजप सरकारच्या कामांचा तसंच भाजपने देशामध्ये केलेल्या सुधारणांचा आणि विकसनशील कामांचा लेखाजोखा माडंला आहे. इतकंच नाही तर लोकांना गेल्या ५ वर्षांत भाजप सरकारला दिलेल्या पाठिंब्यामुळेच हा विकास शक्य झाला आहे, असं म्हणत मोदींनी १३० करोड भारतीयांचे ट्वीटरवरुन आभारदेखील मानले आहेत.

तुमच्या आशीर्वादाची गरज

मोदींनी ट्वीट करत म्हटले की, ‘सबका साथ, सबका विकास.. यापासून प्रेरित होऊन एनडीए सरकार पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद मागत आहे. आम्ही गेल्या ७० वर्षांत अपुरी राहिलेली कामं पूर्ण करण्याचा मागील ५ वर्षांमध्ये प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता एका समृद्ध, शक्तीशाली आणि सुरक्षित भारत देशाची निर्मिती करण्याची वेळ आली आहे. या कार्यासाठी आम्हाला देशवासीयांचे आशीर्वाद हवे आहेत.’

First Published on: March 11, 2019 9:18 AM
Exit mobile version