Elon Muskने दान केले ४० हजार कोटींचे टेस्ला शेअर्स, कोणत्या संस्थेला दिले शेअर्स?

Elon Muskने दान केले ४० हजार कोटींचे टेस्ला शेअर्स, कोणत्या संस्थेला दिले शेअर्स?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये आपल्या इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लाचे ५ अब्जपेक्षा जास्त शेअर्स एका Unspecified Charityला दान केले आहेत. मस्क यांनी १९ ते २९ नोव्हेंबरच्या दरम्यान हे दान केले आहे. टेस्ला ही जगातील सर्वात मोठी ऑटो कंपनी आहे. तसेच कंपनीच्या शेअर्स किंमतीनुसार ही रक्कम ५.७४ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनच्या माहितीनुसार, एलन मस्कने नोव्हेंबर महिन्यामध्ये १० दिवसांच्या कालावधीत ५,०४४,००० इतके शेअर्स हस्तांतरित केले आहेत. परंतु ही देणगी कोणत्या संस्थेला दिली आहे, याचा खुलासा अद्यापही झालेला नाहीये. गेल्या वर्षीच्या अखेरीस १६.४ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले होते. यासाठी त्यांनी ट्विटरवर एका पोल देखील घेतला होता.

नोव्हेंबर महिन्यात विकले होते शेअर्स

मस्कने ट्विटरवर एक पोल घेतला होता आणि आपल्या फॉलोअर्सला विचारले होते की, त्यांनी टेस्लामधील १० टक्के हिस्सा विकावा की नाही. या पोलचा निकाल काहीही लागला तरी त्यांना शेअर्स विकावे लागतील, असेही ते म्हणाले होते. २०२१ मध्ये त्यांना ११ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर भरावा लागणार आहे. २००१ मध्ये मस्क यांनी मस्क फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्याची संपत्ती २० कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे.

दरम्यान, शेअर बाजारातील तेजीमुळे एलन मस्कच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलन मस्कच्या एकूण संपत्तीत ८ अब्ज म्हणजेच जवळपास ६० हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.


हेही वाचा : IPL Mega Auction 2022 : आयपीएलमध्ये १०.७५ कोटींचा पाऊस पडल्यानंतर निकोलस पूरनने दिली पिझ्झा पार्टी


 

First Published on: February 16, 2022 2:52 PM
Exit mobile version