भारतीयांचे लसीकरण इंग्लंडला अमान्य

भारतीयांचे लसीकरण इंग्लंडला अमान्य

इंग्लंडमधील नवीन प्रवासाच्या नियमांनुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांचे लसीकरण इंग्लंडमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही आणि त्यांना १० दिवस अलगीकरणात राहावे लागणार आहे.

नवीन नियमांवर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, कोविशील्ड लस मुळात इंग्लंडमध्ये विकसित करण्यात आली होती. तसेच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने त्यांना देखील लसीचा पुरवठा केला आहे. त्यानंतरही नवीन नियम काढणे हे विचित्र असून हे वर्णद्वेषाचे धक्के आहेत. इंग्लंड सरकारने म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे आफ्रिका, दक्षिण अमेरिका, यूएई, भारत, तुर्की, जॉर्डन, थायलंड आणि रशिया या देशांमध्ये लसीकरण केले गेले असेल तर त्यांचे लसीकरण झालेले नाही, असे मानले जाईल आणि त्यांना अलगीकरणाचे नियम पाळावे लागतील.

First Published on: September 21, 2021 3:00 AM
Exit mobile version