इथिओपियन विमान दुर्घटनेत ४ भारतीयांसह सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू

इथिओपियन विमान दुर्घटनेत ४ भारतीयांसह सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू

इथियोपियन एअरलाइन्सचं विमान

इथियोपियातील अदिस अबाबा येथून नैरोबीला जाणारं इथियोपियन एअरलाइन्सचं एक विमान कोसळून सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ भारतीय प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या विमान अपघातातील मृतांमध्ये १४९ प्रवासी तर ८ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. इथियोपिया विमान कंपनीच्या विमानात जागतिक स्तरावरील एकूण ३० देशांचे प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती विमान कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.

या देशातील प्रवासी होते

रविवारी सकाळी दुर्घटना घडली 

इथियोपिया पंतप्रधान कार्यालयाकडून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान, इथियोपियन एअरलाइन्सचं विमान सकाळी ८.३८ मिनिटांनी अदिस अबाबा येथून निघालं आणि टेक ऑफनंतर अवघ्या सहा मिनिटांनी ८.४४ वाजता विमानाचा संपर्क तुटला. बचावकार्य सुरू आहे. इथियोपियाची राजधानी अदिस येथून सुमारे ६० कि.मी. दूर बिशोफ्टू शही येथे ही दुर्घटना घडली.

१४९ प्रवासी आणि ८ क्रू मेंमर्स

काल, रविवारी इथिओपियन एअर लाईन्सचे नायरोबीला जाणारे विमान फ्लाईट ईटी ३०२ हे विमान बिशोफ्टू या शहराजवळ कोसळल्याची बातमी आली होती. या विमानात १४९ प्रवासी आणि ८ क्रू मेंमर्स होते. एअरलाईन्सच्यावतीने या माहितीला दुजोरा देण्यात आला. एअर लाईन्स बोईंग ७३७-८०० मॅक्स कोसळले असून ही घटना काल, सकाळी घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान कार्यालयातून आदरांदलीचे ट्वीट करण्यात आले.

First Published on: March 11, 2019 9:03 AM
Exit mobile version