घरदेश-विदेशइथिओपियन एअर लाईन्सचं विमान कोसळलं; विमानात १४९ प्रवाशांचा समावेश

इथिओपियन एअर लाईन्सचं विमान कोसळलं; विमानात १४९ प्रवाशांचा समावेश

Subscribe

इथिओपियन एअर लाईन्सचे नायरोबीला जाणारे विमान आज सकाळी कोसळले असल्याची माहिती समोर येत असून या विमानात १४९ प्रवासी आणि आठ क्रू मेंमर्स असल्याचे रेटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाद्वारे सांगितले जात आहे.

इथिओपियन एअर लाईन्सचे नायरोबीला जाणारे विमान आज, १० मार्च रोजी सकाळी कोसळले असल्याची माहिती समोर येत असून या विमानात १४९ प्रवासी आणि आठ क्रू मेंमर्स असल्याचे रेटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाद्वारे सांगितले जात आहे. फ्लाईट ईटी ३०२ हे विमान बिशोफ्टू या शहराजवळ कोसळले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे शहर दक्षिण पूर्व भागात असून राजधानी आदीस अबाबापासून ६२ किमी अंतरावर आहे. एअरलाईन्सच्या वतीने या माहितीला दुजोरा देण्यात आली आहे की, ही एअर लाईन्स बोईंग ७३७-८०० मॅक्स कोसळले असून ही घटना आज सकाळी ८.४४ दरम्यान घडली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान कार्यालयातून आदरांदलीचे ट्वीट करण्यात आले आहे.

दरम्यान, इथिओपियन एअर लाईन्सच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून यामुळे त्यांनी अपघाताच्या बातमीचा तपशील दिला आहे. अपघाताच्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून त्यानंतरच प्रवाशांच्या स्थितीची माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मोदी २०१९ मध्ये पंतप्रधान नसतीलही – नारायण राणे

- Advertisement -

पुण्यात भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू; ३ जण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -