युरोपियन खासदार ओवेसींवर भडकले; ‘आधी आमच्याबाबत माहिती काढा मग बोला’

युरोपियन खासदार ओवेसींवर भडकले; ‘आधी आमच्याबाबत माहिती काढा मग बोला’

असदुद्दीन औवेसी

केंद्र सरकारने युरोपियन युनियनच्या खासदारांना जम्मू-काश्मीरला जाऊन त्या भागाची पाहणी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या परवानगीवरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला होता. केंद्र सरकार नाझी समर्थकांना काश्मीरला जाण्याची परवानगी देत आहे, असे ओवेसी म्हणाले होते. ओवेसींच्या याच टीकेवर युरोपियन खासदार आणि फ्रान्सचे नेते थियरी मरिआनी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्याबाबत काहीही बोलण्याअगोदर माहिती काढणे आवश्यक होते. आम्ही नाझी विचारसरणीचे असते तर आम्ही निवडून आलो असतो का? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका होणार तरी कोण?

नेमके काय म्हणाले युरोपियन खासदार?

युरोपियन खासदार थिअरी मरिआनी हे फ्रान्सच्या द रिपब्लिक्न्स पक्षाचे सदस्य आहेत. ओवेसींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, ‘मी ४० वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. परिवहन मंत्री म्हणून मी काम पाहिले आहे. जर मी नाझी समर्थक असतो तर मी निवडून आलो नसतो.’ त्याचबरोबर ‘आम्हाला नाझी समर्थक म्हणण्यात आले, हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का लागला’. असेही ते म्हणाले.

First Published on: October 30, 2019 9:26 PM
Exit mobile version