अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

external affairs ministers jaishankar

अफगाणिस्तावर तालिबानने कब्जा मिळवल्याने नवं संकट निर्माण झालं आहे. संपूर्ण अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात गेले आहे. यात राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या भीषण परिस्थितीमुळे अफगाणिस्तामध्ये आता अनागोंदी माजली आहे. देशातील नागरिक कसलाही विचार न करता देश सोडून पळत असल्याचे चित्र सर्वत्र पाहयला मिळतयं. यामुळे काबुल विमान तळावर मोठी गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय नागरिकही काबूल विमानतळावर अडकून पडले आहेत. या भारतीयांना लवकरंच देशात आणले जाईल अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली आहे.

Afghanistan-taliban crisis: अफगाणिस्तावर तालिबानचा ताबा, भारतीय बाजारपेठेवर होणार परिणाम

पहिल्या भारतीय विमानाचे काबूलमधून उड्डाण

अफगाणिस्तानमध्ये अडकेल्या १२० पेक्षा अधिक भारतीय अधिकाऱ्यांसह नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाच्या C-17 या विमानाने सोमवारी सायंकाळी काबूलमध्ये उड्डाण केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व भारतीयांना विमानतळाच्या ठिकाणी सुरक्षितपणे आणण्यात आले. तसेच अजूनही काही भारतीयांना येत्या एक ते दोन दिवसांत देशात परत आणले जाईल अशी माहिती समोर आली आहे.

लवकरचं भारतीय नागरिकांना आणले जाईल

भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीकडे लक्ष देऊन आहोत. यात भारतात परत येण्याची इच्छा असलेल्या भारतीयांची चिंता समजून घ्यावी लागेल, परंतु अशा परिस्थितीत एअरपोर्ट ऑपरेशन सर्वात मोठे आव्हान आहे. यामुळे सर्व प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी, अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप देशात आणण्यासाठी विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना केली आहे.

Taliban-अमेरिकेने ‘ज्याची’ कैदेतून केली सुटका त्यानेच केला अफगाणिस्तानचा गेम

काबुल विमानतळावर अराजकतेचे वातावरण

अफगाणिस्तानावर तालिबानने ताबा मिळवताच देश सोडण्यासाठी नागरिक काबूल विमानतळानवर धाव घेत आहेत. अफगाणी नागरिकांनी देश सोडण्यासाठी चक्क विमानाच्या टपावर बसून प्रवास करण्याची तयारी ठेवली होती. याचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडियोत विमान तसं जसे उंच जात होते तसं तसे एक एक करुन अफगाण नागरिक खाली पडत होते.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक

भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत, अफगाणिस्तानवरील तालिबानच्या वर्चस्वा संदर्भात चर्चा झाली. यात अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तेथील महिला, पुरुष आणि लहान मुलांमध्ये आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर घेण्यात आलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत अफगाणिस्तानचे प्रतिनिधी गुलम एम इस्सकई उपस्थित होते.


चीन, पाकिस्तानचा तालिबान्यांकडे मैत्रीचा हात; भारताची चिंता वाढली

First Published on: August 17, 2021 9:20 AM
Exit mobile version