युट्यूबर ध्रुव राठी याचे फेसबुक अकाउंट ब्लॉक करुन पुन्हा सुरु

युट्यूबर ध्रुव राठी याचे फेसबुक अकाउंट ब्लॉक करुन पुन्हा सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे टिका करण्यासाठी प्रसिद्ध असलेला ध्रुव राठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याचे फेसबुक आकाऊंट बंद करण्यात आल्याने तो चर्चेत आला आहे. १८ मार्चला फेसबुक कडून ध्रुव राठीचे आकाउंट बंद करण्यात आले. त्याचे कारण म्हणजे ध्रुव राठीने ब्रिटैनिकामधील लेखाचे काही स्क्रिनशॉट काढून आपल्या फेसबुक आकाउंटवरुन पोस्ट केले होत. त्यामध्ये एडॉल्फ हिटलरच्या जीवनाशी संबंधीत असलेल्या काही गोष्टींचा उल्लेख आहे. त्यामुळे चौकशीसाठी ध्रुवचे आकाऊंट बंद करण्यात आल्याचे फेसबुकने सांगीतले. मात्र त्यानंतर लगेच त्याचे आकाउंट रिस्टोअर करण्यात आले. तसेच त्या संबंधी फेसबुकने माफी देखील मागीतली आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावरुन उघडपणे सरकार विरोधी पोस्ट करणाऱ्या ध्रुव राठीचे फेसबुक आकाउंट बंद करण्यात आले. त्याने नुकतेच फेसबुकवरुन काही फोटो शेअर केले होते. हिटलरच्या जीवनाशी संबंधीत काही गोष्टी या फोटोमध्ये असून त्याला मी हायलाइट केले आहे, असे देखील त्याने या पोस्ट सोबत लिहिले आहे. त्यानंतर फेसबुककडून ध्रुव राठीला एक मेसेज पाठवण्यात आला. आपण केलेली पोस्ट ही फेसबुक नियमांमध्ये बसत नाही. त्यामुळे फेसबुक आपले आकाउंट तीस दिवसांसाठी बंदकरणार असल्याचे या मॅसेजमध्ये त्याला सांगण्यात आले.

फेसबुकचे युटर्न

दरम्यान, फेसबुकने आकाउंट ब्लॉक करुन पुन्हा एकदा सुरु केले आहे. त्याआधी ध्रुव राठीने ट्विटर वरुन ३० दिवसा साठी माझे फेसबुक आकाउंट बंद करण्यात आले आहे. योगायोग म्हणजे ३० दिवसांनीच इलेक्शन आसून माझे आकाउंट बंद झाल्याचे ट्विट केले. त्याच बरोबर भाजपच्या आणि मोदींच्या फेसूबुक आकाउंटच्या बरोबरीने माझ्या आकाउंटला देखील प्रसिद्धी मिळत आहे, असे देखील या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे. तसेच फेसबुकवर ट्रेंड करत असलेल्या आकाउंटचा फोटो देखील त्याने पोस्ट केला आहे. दरम्यान, फेसबुक ने ध्रुवच्या पोस्टमध्ये काहीही आक्षेपार्य नसल्याचे सांगत आमच्याकडून हे चुकून झाल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकच्या नियमांप्रमाणे एखाद्या मोठ्या प्रमाणात व्हयरल होणाऱ्या पोस्टला फेसबुक रिचेक करते. तसेच ती पोस्ट आक्षेपार्य किंवा फेसबुक नियमांच्या बाहेर आहे का? याची चौकशी होईपर्यंत ती पोस्ट ब्लॉक केली जाते.

 

 

 

First Published on: March 19, 2019 1:42 PM
Exit mobile version