माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याची बातमी खोटी

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याची बातमी खोटी

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अगदी एक दिवस अगोदर अशी बातमी पसरली की, अयोध्यामधील जमीन वादावर सुनावणी करणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियापासून ते न्यूज वेबसाईटपर्यंत यासंदर्भातील बातमी दिली जात होती. आज देखील यासंदर्भातले ट्विट शेअर होताना दिसत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही बातमी खोटी असल्याचे समोर येत आहे. स्वतः माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाले नसल्याचे सांगितले आहे.

राजस्थान पत्रिका, हरिभूमी, वन इंडिया आणि टीव्ही ९ भारतवर्ष अशा बऱ्याच न्यूज वेबासाईटने रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती. पण काही वेळानंतर ही बातमी वन इंडिया आणि टीव्ही ९ डिलीट केली. तर राजस्थान पत्रिकाने बातमी एडिट केली.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजीव राय यांनी ट्विटरवर रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याचा दावा केला. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माजी सरन्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. पण हे सत्य नाही आहे.

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ४ ऑगस्टला इंडिया टुडेच्या वरिष्ठ सहकारी संपादक कौशिक डेका यांनी सांगितले की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बातमी चुकीची आहे.’ ऑक्टोबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत रंजन गोगोई भारताचे सरन्यायाधीश होते. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनात्मक खंडपीठाने अयोध्यामधील जमीन वादावर निर्णय दिला होता.


हेही वाचा – Corona Update: राज्यात १०,३०९ नव्या रुग्णांची नोंद, ३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!


 

First Published on: August 6, 2020 12:25 AM
Exit mobile version