भाजपा एजंटचे बुथ कॅप्चरिंग; फेरमतदानाचे आदेश

भाजपा एजंटचे बुथ कॅप्चरिंग; फेरमतदानाचे आदेश

मतदान करणाऱ्या महिलेजवळ जाऊन तिला भाजपाला मत देण्यास सांगणारा पोलिंग एजंट (छायाचित्र : ट्विटर व्हिडिओवरून साभार)

फरिदाबाद बुथ कॅप्चरिंग प्रकरणात भाजपाच्या एका पोलिंग एजंटला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. हरियाणातील पलवल मतदान केंद्रावर लोकसभा मतदानादरम्यान हा प्रकार झाला होता. भाजपाचा हा पोलिंग एजंट मतदान सुरू असताना मतदारांवर दबाव टाकून त्यांचे मतदान भाजपाला देण्यास सांगत होता. मात्र त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल आणि त्याला अटक झाली.

ही घटना फरिदाबाद लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या असावटी गावात लोकसभा मतदानाच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान म्हणजेच १२ मे रोजी घडली होती. सोमवारी निवडणूक आयोगाने या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या तपासानंतर या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने आता शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १९ मे रोजी या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. तसेच संबंधित पीठासीन अधिकाऱ्याला निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे.

First Published on: May 14, 2019 11:19 AM
Exit mobile version