Farm Laws : कृषी कायदा रद्द करण्यावर नवज्योत सिंग सिद्धूंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Farm Laws : कृषी कायदा रद्द करण्यावर नवज्योत सिंग सिद्धूंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी १९ नोव्हेंबरला देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द केले असल्याची घोषणा केली. यावर पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ही घोषणा म्हणजे ‘योग्य दिशेने टाकलेले पाऊल’ असल्याचे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या इतक्या दिवसांच्या त्यागाचे अखेर फळ मिळाले आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.

नवज्योत सिद्धू म्हणाले, “काळा कायदा रद्द करणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. किसान मोर्चाच्या सत्याग्रहाला ऐतिहासिक यश मिळाले आहे. हे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमेवर बेमुदत उपोषणाला बसले होते. अखेर शेतकऱ्यांना त्यागाचे फळ मिळाले आहे.पंजाबमधील कृषी क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचा रोडमॅप हा पंजाब सरकारचा सर्वोच्च प्राधान्य असायला हवा. त्यामुळे पंजाब सरकारनेही पहिले प्राधान्य हे कृषि क्षेत्राला दिले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि संसदेच्या आगामी अधिवेशनात यासाठी योग्य कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असेही सांगितले आहे. मागील ११ महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आणि पावसामध्येही ठाण मांडून होते. मोदींनी गुरु पर्व आणि कार्तिक पौर्णिमेच्या विशेष प्रसंगी तीनही वादग्रस्त नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे.


हे ही वाचा – Farm Laws : पंतप्रधान मोदींनी रद्द केलेले कृषी कायदे काय होते आणि विरोध का होता?


 

 

First Published on: November 19, 2021 12:38 PM
Exit mobile version