Farmers Protest : कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला ११ महिने पूर्ण; आज देशव्यापी आंदोलन, पुढची दिशा काय?

Farmers Protest : कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला ११ महिने पूर्ण; आज देशव्यापी आंदोलन, पुढची दिशा काय?

केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर आंदोलन करत आहे. या आंदोलनाला आज ११ महिने पूर्ण झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाचा एल्गार पुकरला आहे. शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने आज सकाळी ११ ते २ या वेळेत सरकारविरोधात निदर्शने केली जाणार आहे. तसेच लखीमपूर खेरी घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याचे वडील केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांना केंद्रीय पदावरून हटवण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय अजय मिश्रा यांची अटक आणि या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून देशभरातील जिल्हा मुख्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. या मागण्यांबाबत किसान मोर्चाच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात असे लिहिले आहे की, “३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडाचा तपास ज्या पद्धतीने केला जात आहे त्यामुळे संपूर्ण देशातून संतप्त भावना व्यक्त होत आहे. या घटनेबाबत सुप्रीम कोर्टाने यापूर्वी अनेक प्रतिकूल मतं व्यक्त केली आहेत.

याशिवाय निवेदनात असे लिहिले आहे की, “महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारच्या नैतिकतेच्या अभावामुळे देश हादरला आहे, जेथे अजय मिश्रा हे टेनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेत वापरण्यात आलेले वाहन मंत्र्यांचे आहे. मंत्री ३ ऑक्टोबर २०२१ पूर्वीच्या किमान तीन व्हिडिओंमध्ये रेकॉर्डवर आहेत, जे जातीय विसंगती आणि द्वेषाला प्रोत्साहन देत आहेत.

“त्यांनी (मंत्र्याने) आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधात चिथावणीखोर आणि अपमानास्पद भाषणेही दिली, खरं तर, त्याने व्हिडिओमध्ये त्याच्या संशयास्पद (गुन्हेगारी) पूर्ववृत्तांचा उल्लेख करण्यासही संकोच केला नाही. एसआयटीने मुख्य आरोपींना समन्स बजावल्यानंतर मंत्र्याने सुरुवातीला आरोपींना (त्याचा मुलगा आणि त्याचे सहकारी) आश्रय दिला. असेही निवेदनात म्हटले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनला हिंसक वळण मिळत आहे.


Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, २८ ऑक्टोबरपासून १०० टक्के क्षमतेने लोकलच्या फेऱ्या


First Published on: October 26, 2021 9:27 AM
Exit mobile version