Farmer Protest: दिल्लीत आज आंदोलक शेतकऱ्यांकडून ‘पगडी संभाल दिवस’ आंदोलन

Farmer Protest: दिल्लीत आज आंदोलक शेतकऱ्यांकडून ‘पगडी संभाल दिवस’ आंदोलन

Farmer Protest: दिल्लीत आज आंदोलक शेतकऱ्यांकडून 'पगडी संभाल दिवस' आंदोलन

दिल्लीच्या सीमेवर गेल्या ९१ दिवसांपासून केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आज आंदोलक शेतकऱ्यांकडून  ‘पगडी संभाल दिवस’ आंदोलन केले जाणार आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणामधील  शेतकरी आपल्या आत्मसन्मानाचे प्रतिक असलेली पगडी घालून केंद्राच्या तीन कृषी कायद्याला कडाडून विरोध करणार आहेत. दिल्लीच्या सिंघु, टिकारी बार्डर, पंजाब, हरियाणा, चंढीगड अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असून कायद्याला विरोध दर्शवणार आहेत.

या आंदोलनाचे संस्थापक शहीद भगत सिंह यांचे काका अजित सिंह म्हणजेच स्वामी सहजानंद सरस्वती यांना यावेळी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. यावेळी आंदोलक शेतकरी पगडी घालून कृषी कायद्याप्रती विरोध दर्शवणार आहे. या आंदोलनात शहीद भगत सिंह यांच्या भाचा अभय सिंह संधू यांच्यासह कुटुंबिय देखील सहभागी होणार आहेत.

आंदोलक शेतकऱ्यांकडून आंदोलन तीव्र करण्यासाठी २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यादरम्यान आंदोलनाची आग अधिक काळ पेटवत ठेवण्यासाठी नवी रणनीती तयार केली जाणार आहे. याबाबत संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले की, २३ फेब्रुवारी रोजी पगडी संभाल दिवस साजरा करत आंदोलन केले जाईल तर २५ दमन विरोधी दिवस आंदोलन पुकारले जाणार आहे. या आंदोलनातून शेतकरी केंद्र सरकारला असे आवाहन करणार आहे की, शेतकऱ्यांचाही सन्मान करा, तसेच त्यांच्या विरोधात कोणतीही दमदाटी करु नका. त्यानंतर २६ फेब्रुवारीला आंदोलक शेतकरी ‘युवा शेतकरी दिवस’ व २७ फेब्रुवारीला ‘कामगार शेतकरी एकता दिवस’ साजरा करत केंद्रावर तीन कृषी कायदा मागे घेण्यासाठी दबाव टाकला जाणार आहे.


हेही वाचा- महाविकास आघाडीचे निर्बंध म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’, महाजनांचे टीकास्त्र


 

First Published on: February 23, 2021 10:53 AM
Exit mobile version