घरमुंबईमहाविकास आघाडीचे निर्बंध म्हणजे 'लोका सांगे ब्रम्हज्ञान', महाजनांचे टीकास्त्र

महाविकास आघाडीचे निर्बंध म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’, महाजनांचे टीकास्त्र

Subscribe

महाविकास आघाडीतील नेत्यांवरही गुन्हे दाखल करा

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा फोफावला आहे. राज्यात पुन्हा कोरोना महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळेच वाढला असल्याचा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. गिरीश महाजन यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राज्या शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यामुळे काही नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापेक्षा महाविकास आघाडीतील नेत्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्यावर कोरोना संकट असतानाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा, भव्य संमेलने, मोर्चे, मिरवणुका काढल्या होत्या त्यामुळे या नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय सभा, समारंभ,मिरवणुका, मोर्चे आदींवर बंदी घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु आघाडी सरकारचे निर्बंध म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ असे आहेत. याच आघाडी सरकारमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभा, मोर्चे,यात्रांचे आयोजन केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही गर्दी करुन बैठका घेतल्या होत्या यावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संजय राठोड पोहरादेवीला येणार, मंदिराच्या परिसरात फौजफाटा तैनात


शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या आग्रलेखातून राममंदिराच्या उभारणीसाठीच्या वर्गणीवर सडेतोड टीका करण्यात आली होती. यावर महाजन यांनी, मुंबईतील भाजीमार्केमधील विक्रेते आणि फेरीवाले यांच्याकडून शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोटो असलेल्या पावत्या देऊन पैसे वसूल करत असल्याचा आरोप केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -