भारतात आता ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाची भीती; केंद्राचा राज्यांना अलर्ट

भारतात आता ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाची भीती; केंद्राचा राज्यांना अलर्ट

देशात आधीचे कोरोनाचे संकट कमी होण्याचे नाव घेत नसताना आता बर्ड फ्ल्यू विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भीती व्यक्त केली जात आहे. कारण राजस्थानमध्ये अचानक शेकडो कावळ्यांचा ‘बर्ड फ्ल्यू’ने मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. या कावळ्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराचे विषाणू आढळून आले आहेत. त्या ठिकाणचे नमुने गोळा करुन त्याच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर संबंधित विभागाने ‘बर्ड फ्लू’ची लक्षण आढळून आल्याची ठिकाणं निश्चित करण्यासाठी एक मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काही राज्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे.

राजस्थानचे मुख्य सचिव कुंजीलाल मीना यांच्या माहितीनुसार, “आत्तापर्यंत कोटा येथे ४७, झालवार येथे १०० तर बरान येथे ७२ कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. बुंदी येथे एकाही कावळ्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आम्ही आवश्यक पावलं उचलतं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती करत आहोत.”

दरम्यान, शनिवारी राजस्थानातील झालवर येथे २५, बरा येथे १९ आणि कोटा येथे २२ तर जोधपूर येथे १५२ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. झालवर, कोटा, पाली आणि इतर ठिकाणांहून कावळ्यांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये किंगफिशर व मॅगपाईज नावाच्या चिमण्यांचाही समावेश आहे. झालवर येथे याबाबत कन्ट्रोल रुम स्थापन करण्यात आल्याची माहिती मीना यांनी दिली. तसेच संपूर्ण राजस्थानमध्ये हायअलर्ट घोषीत केल्याचेही ते म्हणाले. मध्य प्रदेशातील इंदूर येथे आढळलेल्या मृत कावळ्यांपैकी ५० कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या ठिकाणीही अलर्ट घोषीत करण्यात आला आहे.

First Published on: January 3, 2021 8:43 PM
Exit mobile version