RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला; IBने अलर्ट केला जारी

RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला; IBने अलर्ट केला जारी

पंजाबमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आरएसएसची शाखा आणि हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले आहे. पंजाब सरकारला हा इशारा आयबीने दिला आहे. त्यानंतर पंजाब सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सर्व अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच रात्रीच्या गस्तमध्ये एक तृतीयांश अधिकाऱ्यांना मैदान उतरण्याचे आदेश देखील दिले आहेत.

अलीकडे २१ नोव्हेंबरला उशीरा रात्री पठाणकोटमध्ये धीरा पूलजवळील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर ग्रेनेड हल्ला झाला होता. बाईकस्वार अज्ञातांनी हे ग्रेनेड फेकल्याची माहिती समोर आली होती. सुदैवाने या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जीवतहानी झाली नाही. या हल्लामागे आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १५ ऑगस्टनंतरपासून ते आतापर्यंत २५ हून अधिक वेळा ड्रोन भारतीय सीमेत घुसले आहेत. यामधून हत्यारे, हेरॉईन आणि टिफिन बॉम्ब पाठवले जात आहेत. आतापर्यंत ११ टिफिन बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

तसेच आयएसआय पंजाबमध्ये सतत हत्यारे आणि दारुगोळा पाठवत आहेत. अलीकडेच घडलेल्या अजनाळा घटनेचे धागेही दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी जीरा विधानसभा मतदारसंघातील सेखवां गावातील शेतात एका टिफिनमध्ये हँड ग्रेनेड आढळले होते. आईबीच्या सुत्राच्या मते पंजाबमध्ये टिफिन बॉम्ब आणि ग्रेनेड आयएसआयकडून पाठवले जात आहेत. याद्वारे मोठा दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो. आयबीकडून पंजाबच्या हिंदू नेत्यांना आणि आरएसएस शाखांवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Farmers Protest: कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला आज मिळू शकते मंजूरी; सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक


 

First Published on: November 24, 2021 9:43 AM
Exit mobile version