IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी तिकीटविक्री केंद्रावर चेंगराचेंगरी; 4 जण जखमी

IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी तिकीटविक्री केंद्रावर चेंगराचेंगरी; 4 जण जखमी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील तिसरा सामाना हैदराबादमध्ये होणार आहे. 25 सप्टेंबर रोजी हैदराबामध्ये होणारा हा सामना स्टेडियममध्ये बसून पाहण्यासाठी तिकीट विक्री केंद्रावर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी तिकीटांची खरेदी करत असताना प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. जिमखाना मैदानावर चेंगराचेंगरीमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (fight in Hyderabad for tickets lathi charge to control the crowd)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी 20 सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने तिकीटांची विक्री सुरू केली. त्यावेळी चाहत्यांची झुंबड उडाली. पाहता पाहता जिमखाना ग्राऊंडमध्ये गदारोळ झाला. पोलीस पथक तेथे तैनात होते, मात्र प्रेक्षकांची इतकी गर्दी होती की त्यांनाही गर्दी आवरण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले. वाढलेल्या गर्दीमुळे गोंधळ झाला आणि एकच चेंगराचेंगरी झाली. यात 4 जण जखमी झाले. त्यांना तातडीने तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व सलामीवीर अॅरॉन फिंचने सामन्याच्या सुरूवातीलाच फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संघाला 209 धावांचे आव्हान पार करणे सहज शक्य झाले.


हेही वाचा – भारतीय महिला संघाने रचला इतिहास, 23 वर्षांनंतर ब्रिटिशांना त्यांच्याच देशात केले पराभूत

First Published on: September 22, 2022 5:57 PM
Exit mobile version