आमचे मित्र ‘जनता’, ‘जावई’ नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

आमचे मित्र ‘जनता’, ‘जावई’ नाही; केंद्रीय अर्थमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

यूपीए सरकारच्या 'त्या' चुकीमुळे इंधनाचे दर तुर्तास कमी करणे अशक्य- निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी लोकसभेत आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. आमचे मित्र जनता आहे, जावई नाही, असा पलटवार निर्मला सीतारमण यांनी केला. सर्वसाधारण अर्थसंकल्प हा ‘क्रोनी कॅपिटालिस्ट’ हिताचा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. विरोधी पक्षांच्या या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं आहे. गरीब आणि सर्वसामान्य लोक हे आमचे मित्र आहेत. सरकार हे त्यांच्यासाठीच काम करते, असं सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेत झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये त्या बोलत होत्या.

केंद्र सरकार भांडवलशाहीला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रत्युत्तर दिलं. देशातील गरीब जनता आणि सर्वसामान्य जनता सरकारचे ‘मित्र’ आहेत आणि ते त्यांच्यासाठी काम करतात. सीतारमण यांनी कॉंग्रेसचं नाव न घेता ‘आमचे मित्र (क्रोनीज) जावई नाहीत. असे लोक पक्षाच्या आश्रयाखाली लपून बसले आहेत, ज्याला जनतेने नाकारले आहे, असा टोला लगावला. हे गरीब आणि शेतकर्‍यांचं बजेट आहे, असं सीतारमण म्हणाल्या.

२०२०-२२ च्या अर्थसंकल्पावरील लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत गरीब, पथ विक्रेत्यांना मोदी सरकारने १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली. देशातील ५० लाख गरीब, पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेतला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर दोन-तीन उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काम करीत असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना सीतारमण यांनी तिखट शब्दांत उत्तर दिलं.

सीतारमण यांनी सल्ला दिला की केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप करण्याऐवजी विरोधी पक्षांनी या सर्व योजनांचा अभ्यास केला पाहिजे. यावेळी त्यांनी राहुल गांधींचं नाव न घेता ‘हम दे हमारे दो’ मध्ये जावयाची जमीन परत करण्याची गोष्ट केली असती तर चांगंल झालं असतं, असा टोला लगावला.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा देऊ – अमित शाह


 

First Published on: February 13, 2021 5:48 PM
Exit mobile version