डेन्मार्क येथील गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपीला अकराव्या मिनिटालाच अटक

डेन्मार्क येथील गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपीला अकराव्या मिनिटालाच अटक

डेन्मार्कची राजधानी (Denmark) कोपेनहेगनमध्ये (Copenhagen) एका शॉपिंग मॉलमध्ये बेछूट गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी हा हल्ला झाला. हल्ल्याच्या अकराव्या मिनिटालाच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एथनिक डेन (Ethnic Denn) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हल्ला झाला तो मॉल डेन्मार्कमधील सर्वांत मोठा मॉल आहे. (Firing at Denmark, three people died)

हेही वाचा – जगन्नाथ रथ यात्रेचं मुस्लीम, शीख धर्मियांकडून जल्लोषात स्वागत

बेछूट गोळीबार होताच कॉपेनहेगन पोलिसांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळ येथील अमेगर जिल्ह्यातील फिल्ड मॉलजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता कोपनहेगनचे पोलीस निरीक्षक सोरेन थॉमसेन यांनी व्यक्त केली आहे. हा हल्ला एकट्या तरुणाने केला आहे. त्यामुळे पोलीस दहशतवादी हल्ल्याची शक्यता तपासत आहेत. डेन्मार्कमध्ये गोळाबारासारख्या घटना दुर्मिळ असल्याचंही त्यांन सांगितलं.

हेही वाचा – एअर इंडिगोची देशभरात तब्बल 900 उड्डाणे उशिरा, DGCAने मागितला खुलासा

गोळीबार झाला तेव्हा मॉलमध्ये धावपळ सुरू झाली, यावेळी १०० हून अधिक लोक जिवाच्या आकांताने मॉलबाहेर पळू लागले. काही लोक दुकानातच लपून बसले होते. दरम्यान, या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीसह दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी असून तिघांवरही उपचार सुरू आहेत.

First Published on: July 4, 2022 10:21 AM
Exit mobile version