कोरोना रोखण्यासाठी लस विकसित, अमेरिकेत पहिली मानवी चाचणी यशस्वी!

कोरोना रोखण्यासाठी लस विकसित, अमेरिकेत पहिली मानवी चाचणी यशस्वी!

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विकसित करण्यासाठी लसीची अमेरिकेत मानवी चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील ही पहिली मानवी चाचणी करण्यात आली आहे. ज्यांना ही लस टोचण्याक आली, त्यांच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत. त्याचबरोबर आता त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढविण्यात आली आहे. असे ही लस विकसीत करणाऱ्या मोडर्ना कंपनीने जाहीर केलं आहे.

या लसीचा प्रयोग आठ जणांवर करण्यात आला. त्यानंतर त्यातून आलेल्या रिपोर्टवरून लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेत मार्चपासून या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ही चाचणी करताना आठ स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात तयार झालेल्या अ‍ॅंटीबॉडीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. या चाचणीतून मुख्यत्वे व्हायरसचा शरीरात होणारा फैलाव रोखण्यामध्ये ही लस अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले.

चाचणीचा दुसरा टप्पा

या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात ६०० तंदुरूस्त स्वयंसेवकांवर MRNA – १२७३ या लसीची चाचणी करणार आहे. ६०० स्वयंसेवकांपैकी निम्मे १८ ते ५५ वयोगटातील तर उर्वरित ५५ च्या पुढच्या वयोगटातील असतील. MRNA – १२७३ लसीद्वारे करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यात येईल. त्यानंतर जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्यात १ हजार लोकांवर चाचणी करण्यात येणार आहे. एफडीएने दुसऱ्या फेजसाठी मोडर्नाला परवानगी दिली आहे.

नोव्हाव्हॅक्स करणार मानवी चाचणी

नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी सुद्धा लवकरच लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. सध्याच्या घडीला Covid-19 ची लस सर्वांसाठीच महत्वाची आहे. जगात जवळपास १०० संशोधकांचे गट कोरोनाला रोखणारी लस शोधून काढण्यासाठी संशोधन करत आहेत. संशोधन ते क्लिनिकल चाचण्या अशा वेगवेगळया टप्प्यांवर हे लस प्रकल्प आहेत.


हे ही वाचा – मोदी सरकार पेन्शन धारकांसाठी घेऊन आली आहे नवी योजना!


 

First Published on: May 19, 2020 11:02 AM
Exit mobile version