चीनद्वारे लावलेले चंद्रावरील ‘ते’ झाड झाले मृत

चीनद्वारे लावलेले चंद्रावरील ‘ते’ झाड झाले मृत

चंद्रावरील रोपटे

चीन हा नेहेमीच काहीतरी वेगळे संशोधन करून जगाचे लक्ष आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतो. मागील काही वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा बघायला मिळाली आहे. यानंतर जगासमोर नंबर १ बनायचा प्रयत्न चीन करत आहे. जे कधीही कोणत्या देशाने नाही केले ते आपण करून दाखवायचे अशी चीनची निती आहे. यांअतर्गत चीन विविध प्रकल्प राबवत आहे. याच प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प चीनने राबवला आहे. चीनच्या अवकाश संशोधन केंद्राने चंद्रावर जाऊन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रावर जाऊन झाड उगवून तिथेही जीवनाची सुरुवात करता येईल म्हणून चीनचे प्रयत्न केलेत. मात्र अखेर हे प्रयत्न फोल ठरले आहे. मात्र यामुळे चीनने अवकाश क्षेत्रात एक नवीन क्रांतीला सुरूवात केली आहे.

काय आहे ही नवीन क्रांती

पृथ्वी बाहेर कोणत्याही ठिकाणी जीवन आढळत नसल्याचा दावा अनेकांनी केला. मात्र हा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न चीनद्वारे केला जात आहे. चंद्रावर मानवी वस्तीची संकल्पना आपण नेहमी चित्रपटात बघत असतो. मात्र प्रत्यक्षात ही एक असंभव गोष्ट असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. चंद्रावर पृथ्वी सारखे वातावरण तयार करून तेथे मानवी वस्तीची स्थापना या भविष्यातील कल्पना आहेत. चंद्राच्या वातावरणात जास्तीत जास्त माणूस १५ सेकंद जगू शकतो. मात्र चीनद्वारे काही महिन्यांपूर्वी एक मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये त्यांनी कापसाच्या झाडाचे बीज चंद्रावर पाठवले होते. चंद्रावर या बीजापासून रोपटे बनवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला होता.

प्रयत्न ठरले फोल

चीनचे हे प्रयत्न अखेर फोल ठरले आहे. चीनद्वारे पाठवण्यात आलेल्या या बीजाचे रोपट्यामध्ये रुपांतर होत होते. मात्र काही दिवसातच कमी तापमानामुळे हे रोपटे मृत पावले. -१७० डिग्री तापमानामुळे हे रोपटे मृत झाल्याचे चीनने सांगितले आहेत. चंद्रावरील तपामान हे जीवनासाठी प्रतिकूल नसल्याचे दिसून आले. मात्र येत्या काळात चीन अशा प्रकारचे प्रयत्न सुरुच ठेवणार आहे.

First Published on: January 17, 2019 3:39 PM
Exit mobile version