थोड्याच वेळात भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता

थोड्याच वेळात भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता

भाजप

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत अनेक चर्चांना उधान आले होते. मात्र, या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण थोड्याच वेळात भाजप विधानसभा निवडणुकासाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ११२ जागांवर उमेदवार निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या दोन महिन्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या नेत्यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, थोड्याच वेळात भाजप ११२ उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार आहे.

First Published on: September 29, 2019 9:59 PM
Exit mobile version