काश्मीरच्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

भारतातल्या ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्लाचा संशय

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरु असतानाच काश्मीरच्या कुगम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. लष्कराच्या जवानाने परिसराला चारही बाजुनी वेढले असून चकमक अद्याप सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पाच दहशतवादी ठार

केल्लम गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. ही माहिती मिळताच लष्कराच्या जवानाने परिसरात शोधमोहीम सुरु केली. त्यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानानेही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या दरम्यान लष्कराच्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले असून आणखी एक ते दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमधील चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी चकमक सुरु झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्डसच्या जवानांनी ही कामगिरी बजावली होती.

जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील राजपोरा भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे शहीद अहमद बाबा आणि अनियत अहमद जिगर अशी आहेत. हे दोन्ही दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती समोर आली होती. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी एक एसएलआर आणि एक बंदुक जप्त केली. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसात दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या दोन जवानांसह १२ जण जखमी झाले असून या घटनेनंतर जवानांकडून ठिकठिकाणी कॉबिंग ऑपरेशन करण्यात आले होते.


वाचा – सोलापूर : पोलीस – दरोडेखोरांमध्ये चकमक; १ ताब्यात ५ दरोडेखोर फरार

वाचा – पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या


 

First Published on: February 10, 2019 11:57 AM
Exit mobile version