या कारणावरुन AMU ने केले तीन विद्यार्थ्यांना निलंबित

या कारणावरुन AMU ने केले तीन विद्यार्थ्यांना निलंबित

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर मन्नान बशीर याच्या

अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले. हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर मन्नान बशीर याच्या मृत्यूनंतर शोकसभा घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मन्नास देखील याच विद्यापीठाचा विद्यार्थी होता. रिसर्च स्कॉलर म्हणून त्याची ओळख विद्यापीठात होती. मात्र शिक्षण अर्धवट सोडून तो हिज्बुलमध्ये तो सामील झाला होता. शिक्षण सोडून त्याला हे पाऊल का उचलावे लागले यावर अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थीत करण्यात येत आहे. जम्मु-काश्मीर येथे लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशत वाद्यांना ठार करण्यात आले होते. यामध्ये मन्नान याचाही मृत्यू झाला होता. यानंतर अलिगड मुस्लिम विद्यापीठातील सभागृहात १२ विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वनीसाठी नमाज अदा केली होती. विद्यार्थ्यांनी नियमभंग केल्याचे विद्यापीठाचे मोहसिन खान यांनी सांगितले आहे.

विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या. नमाज पठण करतवेळी या विद्यार्थ्यांना थांबवले होते. दहशतवाद्यासाठी नमाज पठण करणे योग्य नसल्याचे विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष फैजुल हसन यांनी सांगितले. मन्नान या विद्यापीठातून पीएचडी करत होता. शिक्षण अपूर्ण घेऊन त्याने हिज्बुल मुजाहिदीन संघटनेत प्रवेश केला. संघटनेने त्याला कुपवाडा येथील कमांडर पद दिले. मात्र याची माहिती विद्यापीठाला मिळताच त्याला काढून टाकण्यात आले होते.

First Published on: October 12, 2018 4:59 PM
Exit mobile version