घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू कश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत झाली. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. एका दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. आज जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले तर एक जवान जखमी झाला आहे. बुधवारी रात्रीपासून ही चकमक सुरु होती. हंदवाडा जिल्ह्यातील सतगुंड भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. या माहितीच्या आधारे जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. या परिसरामध्ये तीन दहशतवादी लपून बसले होते. यामधील दोघांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. लपून बसलेल्या आणखी एका दहशतवाद्याचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

सुरक्षिततेच्या कारणास्तव इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच या भागातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या निवडणुकीवर दहशतवादाचे सावट आहे. दहशतवादी या निवडणुकी दरम्यान बहिष्कार टाकण्याच्या धमक्या देत आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरच्या संवेदनशील भागामध्ये आधीच सुरक्षा वाढवण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -