रघुराम राजन काँग्रेसचा जाहिरनामा बनवणार?

रघुराम राजन काँग्रेसचा जाहिरनामा बनवणार?

रघुराम राजन

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेस पक्षाचा जाहिरनामा बनविण्यात मदत करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राजन यांनी काही दिवसांपूर्वी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले नव्हते. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, असे म्हटले होते. शिवाय, नोटबंदीच्या निर्णयाला आपला पूर्णपणे विरोध होता, असेही त्यांनी म्हटले होते. रघुराम राजन म्हणजे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक. राजन यांच्या अर्थकौशल्याचा फायदा घेऊन काँग्रेस रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेऊन जाहिरनामा तयार करत आहे.

काँग्रेसची निवडणूकपूर्व तयारी सुरु

देशात लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपला जाहिरनामा सादर करणार आहे. या जाहिरनाम्यासाठी काँग्रेस एक व्हिजन डॉक्यूमेंट तयार करत आहे. या डॉक्यूमेंटमध्ये रोजगार आणि कृषी विकासासंदर्भात महत्त्वाची माहिती लोकांसमोर सादर केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची भेट घेतली. राहुल गांधींनी या जाहिरनामासाठी एक कमिटी बनवली आहे. या कमिटीची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रिय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर या कमिटीमध्ये सॅम पित्रोदा आणि शशी थरुर यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दुबईत राहुल गांधींनी घेतली भेट

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नुकतेच दुबईच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रघुराम राजन यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी जाहिनाम्यासंबंधित चर्चा केली. राजन यांनी या भेटीनंतर एक सखोल अहवाल तयार केला आहे. हा अहवाल काँग्रेस स्वत:च्या जाहीरनाम्यात सादर करणार आहे.

First Published on: January 17, 2019 7:41 PM
Exit mobile version