माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण, AIIMS रुग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण, AIIMS रुग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ८८ वर्षीय मनमोहन सिंह यांनी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे म्हणजेच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एम्स रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना ट्रोमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच ते ठीक होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ, युवा काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी वी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोष सिसोदियासह अनेक नेत्यांनी त्यांच्याबाबत ट्वीट करून प्रार्थना केली आहे.

दरम्यान देशाची राजधानी दिल्लीसह देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी वाढत होत आहे. रविवारी दिल्लीत २५ हजार ४६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि १६१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आता दिल्ली लॉकडाऊन जाहीर केला आहे. केजरीवाल सरकारने ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून आज रात्री १० वाजल्यापासून लॉकडाऊनचा सुरुवात होणार असून पुढच्या आठवड्याच्या सोमवारी ५ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.


हेही वाचा – ‘एक पॅग रोज, दूर रहेंगे रोग’ महिलेने दारू दुकानाबाहेरच दिल्या हेल्थ टिप्स


 

First Published on: April 19, 2021 7:04 PM
Exit mobile version