Fortune India Powerful Women: शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारमण पहिल्या स्थानावर

Fortune India Powerful Women: शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारमण पहिल्या स्थानावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. Fortune Indiaने ५० शक्तिशाली भारतीय महिलांची यादी जाहीर केली आहेत. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचे सुप्रसिद्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आहेत. तर तिसऱ्या स्थानावर WHO च्या Chief Scientist सौम्या स्वामीनाथन यांचं नाव आहे. टॉप १०मध्ये चौथ्या क्रमांकावर किरण मजूमदार शॉ, अरुंधती भट्टाचार्य, गीता गोपीनाथ, सुचित्रा इले आणि रेड्डी यांचा देखील समावेश आहे.

लॉकडाऊन नंतर पत्रकार परिषद घेणाऱ्या पहिल्या मंत्री

Fortune India च्या वेबसाईटवर निर्मला सीतारमण यांच्याबाबतीत सांगितलं गेलं आहे की, मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर ३६ तासांनंतर पत्रकार परिषद घेणाऱ्या त्या पहिल्या कॅबिनेट मंत्री आहेत. संपूर्ण देश त्यावेळी सरकारी योजनेच्या बाबतीत जाणून घेण्यास उत्सुक होता. कोविडच्या भीषण परिस्थितीमुळे अर्थव्यवस्था रूळावर कशी येईल? या गोष्टीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली.

कोरोना काळात अर्थमंत्र्यांनी दिलं होतं आव्हान

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी Fortune India ला सांगितलं की , कोरोनाच्या काळात मागील दीड वर्षात आणि त्यानंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. अर्थमंत्र्यांनी कोरोनाच्या काळात १८ महिन्यांना स्वत:ला आव्हान दिल्याचं म्हटलं होतं.

First Published on: December 1, 2021 9:14 PM
Exit mobile version