परदेशात बसून ‘आधार’ केले हॅक

परदेशात बसून ‘आधार’ केले हॅक

प्रातिनिधिक फोटो

तुमचे बँक अकाऊंट, सिम कार्ड आधार कार्डशी लिंक करा, अशा मेसेजेसनी तुम्हाला कित्येकदा भांडावून सोडले असेल. पण अजूनही तुमचे आधार कार्ड तुम्ही लिंक केले नसेल तर थांबा आधी ही बातमी वाचा. कारण एका परदेशी हॅकरने सातासमुद्रापार राहूनही आधार कार्ड हॅक केले आहे. विशेष म्हणजे हे आधार कार्ड सर्वसामान्य माणसाचे नाही. ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांचे आहे. या हॅकरने त्यांची सगळी माहिती त्यांना त्यांच्या ट्विटवर दिली आहे. त्यामुळे माहिती गोपनीय ठेवण्याचा दावा करणारे ‘आधार’ सर्वसामान्यांना ‘निराधार’ तर करणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

नेमकं काय झालं?

आयआयटी मद्रासचा सिव्हिल इंजिनीअर श्रीनिवास कोडाली याने ट्विट केलेल्या एका बातमीचा दाखला देत आधार कार्डसाठी पुरवलेली माहिती खरचं सुरक्षित आहे का? असा प्रश्न एका युजरने विचारला आणि त्याने शर्मा यांना त्यांचा आधार क्रमांक शेअर करायला सांगितला. शर्मा यांनी देखील त्यांचा आधार कार्ड शेअर केला. आणि अवघ्या काहीच तासात एका फ्रेंच हॅकरने शर्मा यांनी दिलेल्या आधारक्रमांकावरुन सगळी माहिती हॅक केली आणि त्यांचा मोबाईल नंबर शेअर केला. शिवाय तो क्रमांक त्यांच्या सचिवाचा असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचा व्हॉटसअप डिपी देखील त्याने ट्विटवर शेअर केला  हे सगळं करणारा एलिएट एडरसन असून त्याने ही माहिती दिल्यानंतर ‘एवढीच माहिती देऊन थांबतो, पण आधार क्रमांक सार्वजनिक करणे धोकादायक आहे, असे त्याने ट्विट देखील केले.

आधारवर टीवटीवाट

नेटीझन्सला या ट्विटनंतर खाद्यच मिळाले. गोपनीयतेचा दावा करणाऱ्या प्रणालीवरुन सर्वसामान्यांनी त्यांना फैलावर घेतले. शिवाय अनेकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पण तरीही शर्मा हे गोपनीयतेवर ठामच राहिले.

‘हॅक हुए फिर भी टांग ऊपर’

सर्वसामान्यांनी फैलावर घेऊन आणि हॅक होऊनही टांग ऊपर अशी काहीशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली. ते त्याला रिट्विट करत म्हणाले, की तू चांगला हॅकर नाहीस. माझ्या आधारशी बँकाचे अकाऊंट लिंक आहेत ते तू शोधले नाहीस तर याचा काही उपयोग नाही. इतकं सगळं झाल्यानंतर आता आधार खरचं माहिती गोपनीय ठेवू शकेल का? असा प्रश्नच आहे.

मोदींना केले चॅलेंज

हॅकरने आपले मुद्दे मांडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चॅलेंज दिले आहे. तुम्ही  तुमचा आधार नंबर शेअर करा. असे त्याने ट्विट करुन सांगितले आहे.

First Published on: July 29, 2018 12:31 PM
Exit mobile version