Fuel Price Hike : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन; हजारो कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर

Fuel Price Hike : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन; हजारो कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर

Fuel Price Hike : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन; हजारो कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर

महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान पेट्रोल- डिझेलच्या दरात आणि गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ सुरु आहे. दरम्यान मार्च ते एप्रिल महिन्यात पेट्रल आणि डिझेलच्या किमती सतरा वेळा वाढल्या आहेत. यात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले असून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. यापार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलने सुरु आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस आजही (7 एप्रिल) देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

लखनौ येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस प्रवक्त्यांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. ते म्हणाले की, 62 कोटी अन्नदाते कराच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. रोज सकाळी पंतप्रधान तेलाच्या किमती वाढवून देशातील जनतेला गुड मॉर्निंगचा संदेश देतात. गेल्या 16 दिवसांत त्यांच्या किमती 14 वेळा वाढल्या आहेत.

युवा काँग्रेसनेही दरवाढीविरोधात निदर्शने

बुधवारी हरियाणातील भिवानी येथे युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात निदर्शने केली. हंसी गेट येथे युवा काँग्रेसच्या आंदोलकांनी भाजप सरकारच्या पुतळ्याचे दहन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

भाजप जनतेची लूट करण्यात मग्न

भाजप सत्तेत आल्यापासून जनतेची लूट करण्यात मग्न असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास कुमार यांनी केला. सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुमार यांनी सरकारला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढलेल्या किमती मागे घेण्याचे आवाहन केले आहे.


Live Update: खासदार संजय राऊत यांचे आज मुंबईत जंगी स्वागत

First Published on: April 7, 2022 8:12 AM
Exit mobile version