Fumio Kishida : फुमिओ किशिदा यांची जपानच्या पंतप्रधान पदी निवड

Fumio Kishida : फुमिओ किशिदा यांची जपानच्या पंतप्रधान पदी निवड

जपानच्या संसदेने सोमवारी फुमिओ किशीदा यांना नवे पंतप्रधान म्हणून मतदान केले. फुमिओ किशीदा यांच्या नेतृत्त्वातील कॅबिनेटची घोषणा होणे अपेक्षित आहे. या मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाकडून त्यांना पाठिंबा मिळणे अपेक्षित असून आगामी महिन्यात निवडणूका लागणे अपेक्षित आहे.

सत्ताधारी पक्ष असलेल्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने बहुमताने आणि औपचारिकरीत्या किशिदा यांनी पंतप्रधान पदासाठी निवडले आहे. एकाच वर्षात दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी देशात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर वरिष्ठ सभागृहाचे मतदान हे पुढील वर्षी होणे अपेक्षित आहे.

माध्यमांनी जाहीर केल्याप्रमाणे याठिकाणी कॅबिनेट सदस्यांची निवड झाल्याचे वृत्त आहे. किशीदा यांनी एडीपीच्या नेतृत्वपदाची स्पर्धा गेल्याच आठवड्यात जिंकली. तीन जणांना पराभूत करत त्यांनी हा मान मिळवला आहे. त्यापैकी दोन जणांना पक्षात नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देणे हे नव्या पंतप्रधानांसमोरील आव्हान असणार आहे. तर चीनसोबतच्या संबंधातही समतोल राखणे हेदेखील आव्हान असणार आहे.

किशिदा यांच्याकडून तीन महिला चेहऱ्यांना यंदाच्या कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. जवळपास २० सदस्यांचे हे कॅबिनेट असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वाधिक अशा जागा पुरूषांना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या मंत्रीमंडळातील अनेक जणांच्या जागा या कायम ठेवण्यात येणार असल्याचेही कळते. कोरोना काळात सरकारकडून घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांमध्ये सुधारणा करणे हे किशिदा यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात जपानमध्ये आपत्कालीन परिस्थिती होती. पण या निर्बंधांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याने गेल्याच आठवड्यात शिथितला देण्यात आली आहे. जपानमधील ६० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील आरोग्य यंत्रणेत सुधारण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणे हेदेखील त्यांच्यासमोरील आव्हान असणार आहे.


हेही वाचा – Monsoon Withdraw : १९६० नंतर यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने, तारीख ठरली

First Published on: October 4, 2021 11:06 AM
Exit mobile version