Gaganyaan Mission: अंतराळात कधी पाठवले जाणार गगनयान? केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Gaganyaan Mission: अंतराळात कधी पाठवले जाणार गगनयान? केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Gaganyaan Mission: अंतराळात कधी पाठवले जाणार गगनयान? केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

भारताचे गगनयान २०२२च्या अखरेस अंतराळात पाठवले जाणार होते. पण आता गगनयान मिशन २०२२ अखेरस किंवा २०२३च्या सुरुवातीला होणार असल्याचे शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. कोरोना महामारीमुळे गगनयान मिशन उशीरा होणार आहे. या मिशनचे ध्येय पृथ्वीच्या कमी कक्षामध्ये अंतराळवीरांना पाठवणे आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘वास्तविक आम्ही हे मिशन २०२२ मध्ये करणार होतो. आम्ही देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्ताने हे मिशन करण्याची योजना बनवली होती, परंतु कोरोनामुळे असे करू शकलो नाही. पण पुढच्या वर्षीच्या अखेरस किंवा २०२३च्या सुरुवातीला आम्ही हे मिशन करू.’ सरकारच्या मते, शैक्षणिक संस्थांशीसंबंधातून चार जैविक आणि दोन सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोग गगनयान कार्यक्रमासाठी केले गेले आहेत.

अंतराळ विभागाचे राज्यमंत्री फ्यूचर ऑफ इंडिया-ओसियानिया स्पेस टेक्नोलाजी पार्टनरशिपवर आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाने भूमिका बजावली आहे. आपत्ती व्यवस्थापनात देखील हे उपयुक्त आहे. तीन भारतीयांना अंतराळात पाठवण्याची मोठी भूमिका आहे.

या वेबिनारचे आयोजन फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)ने केले होते. यावेळी सिंह अंतराळ क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप आणि उद्योगांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या गरजेवरही भर दिला. ते म्हणाले की, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक बेट देश भारताबरोबर सहकार्य वाढवून अंतराळ तंत्रज्ञानाच्या विकासात भागीदार होऊ शकतात.


हेही वाचा – Coronavirus: जगभरातील कोरोना रुग्णसंख्येत दोन महिन्यांतील सर्वात मोठी घट, WHOची माहिती


 

First Published on: September 16, 2021 8:52 AM
Exit mobile version