Ganesh Chaturthi 2021: गणपती बाप्पा मोरया… राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2021: गणपती बाप्पा मोरया… राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2021: गणपती बाप्पा मोरया... राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदींसह अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. आज देशभरातील घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पाची मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आजपासून पुढील १० दिवस देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह साजरा केला जाईल. या विशेष मुहूर्तावर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना शुभेच्छा. माझी इच्छा आहे की, विघ्नहर्ता गणेश कोरोनाविरूद्ध आमचे प्रयत्न यशस्वी करत सर्वांना आनंद आणि शांतीचा आशीर्वाद लाभो.

 

पंतप्रधान मोदींनीही मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी लिहिले की, ‘आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”

याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, ‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.’
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंगी प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!

हिंदू महिन्याच्या चौथ्या दिवसापासून गणेश चतुर्थीला सुरु होते. दहा दिवसांच्या या उत्सवाला यावर्षी १० सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. गणेशोत्सवात लाखो भाविकांनी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक सहभागी होत उत्सवाचा आनंद घेतात.


ganesh chaturthi 2021 : बेकरी व्यावसायिकाने साकारला इको फ्रेंडली चॉकलेट बाप्पा, पाहण्यासाठी भाविकांची गर्दी


 

First Published on: September 10, 2021 3:50 PM
Exit mobile version