गाझीपूर सीमा लाठीहल्ला : भाजप नेत्याच्या तक्रारीवरुन २०० शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल

गाझीपूर सीमा लाठीहल्ला : भाजप नेत्याच्या तक्रारीवरुन २०० शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल

गाझीपूर बॉर्डरवर भाजप कार्यकर्ते आणि भारतीय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी हाणामारी झाली होती. या प्रकरणात भाजप नेता अमित वाल्मिकी यांनी तक्रार दाखल केल्यामुळे २०० भारतीय किसान कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी भाजप कार्यकर्ते गाझीपूर बॉर्डवर मोठ्या संख्येनं अमित वाल्मिकी यांच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना निदर्शनं आणि विरोध केला असता त्यांच्यावर लाठी हल्ला आणि दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.

केंद्र सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. मागील ७ महिन्यांपासून हे शेतकरी गाझीपूर बॉर्डवर आंदोलन करत आहेत. परंतु बुधवारी भाजप नेते अमित वाल्मिकी यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते गाझीपूर बॉर्डवर जमले होते. यादरम्यान शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. शेतकरी आंदोलकांची संख्या अधिक असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.

या प्रकरणात भाजप नेते वाल्मिकी यांनी तक्रार दाखलकेली आहे. या तक्रारीनुसार २०० अज्ञातांविरोधात कौशम्बी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आली आहे. कलम १४७,१४८,२२३,३५२,४२७,५०६ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हा हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी व्हिडिओ काढला असून या व्हिडिओच्या आधारे चौकशी करण्यात येत आहे.

राकेश टिकैत यांचा भाजपवर आरोप

भाजपकडून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते जाणूनबुजून व्यासपिठावर आले होते. जर त्यांना व्यासपिठावर यायचेच असेल तर भाजपला सोडून या. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करणं चुकीचे आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला जाईल असा इशाराच भारतीय किसान संघटेनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.

First Published on: July 1, 2021 6:15 PM
Exit mobile version