LockDown: पोलिसांनी अडवली गाडी; तरुणीने घातला भररस्त्यात गोंधळ

LockDown: पोलिसांनी अडवली गाडी; तरुणीने घातला भररस्त्यात गोंधळ

सौजन्य - अमर उजाला

लखनौमधील गौतमपल्ली पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या पोलीस चेक नाक्यावर गाडीमधून जाणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी अडवले. पोलिसांच्या मते या तरुणींना १०९० च्या चेकनाक्यावरही थांबवण्यात आले होते. मात्र पोलिसांना न जुमानता त्या पुढे निघून गेल्या. याबाबतची माहिती सर्व चेकनाक्यावरील पोलिसांना व्हायरलेसवर देण्यात आल्यानंतर गौतमपल्ली चेकनाक्यावर ती गाडी थांबवण्यात आली. गाडीची कागदपत्रे मागितल्यानंतर या तरुणींनी पोलिसांना उद्धटपणे उत्तर देत कागदपत्रे तोंडावर भिरकावली. तर पोलिसांनीही कारवाई करत पावती फाडली. तसेच त्या तरुणींविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा – आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : कृषीमंत्री दादा भुसे

काय आहे घटना 

याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात तीन तरूणी गाडीतून १०९० च्या चौकत आल्या. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दुर्लक्ष करत अजून वेगाने गाडी चालवली. पुढे आम्ही ती गाडी अडवली. मात्र तरुणींनी रागाच्या भरात हुज्जत घालायला सुरूवात केली. मोठमोठ्याने बोलू लागली. हा सर्व प्रकार सुरू असताना तेथील काही लोकांनी या घटनेला मोबाईलमध्ये शूट केले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली.

दरम्यान, त्या तरुणींनी आपले नातलग हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्यांना बघायला म्हणून जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले. मात्र नंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यानंतर तिथे त्यांचा कोणताही नातलग दाखल नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांना दिलेली धमकी या आरोपांखाली त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

कोरोनाचा प्रसार वाढला, मात्र चाचण्या अद्याप कमी – सोनिया गांधी

First Published on: April 23, 2020 7:02 PM
Exit mobile version