घरCORONA UPDATEकोरोनाचा प्रसार वाढला, मात्र चाचण्या अद्याप कमी - सोनिया गांधी

कोरोनाचा प्रसार वाढला, मात्र चाचण्या अद्याप कमी – सोनिया गांधी

Subscribe

आर्थिक घडामोडी थांबल्यामुळे बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला या संकटाला तोंड देण्यासाठी किमान ७,५०० रुपये देण्यात यावेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

देशात गेल्या तीन आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूनाचा प्रसार आणि त्याची व्याप्ती दोघांमध्ये वाढ झाली आहे, असं कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी म्हटलं आहे. सरकारने टेस्टिंग किट वाढवायला हव्यात, तसंच कमी प्रमाणात टेस्टिंग केली जात आहे, तसंच निकृष्ट दर्जाचे किट असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. कॉंग्रेस वर्किंग कमिटी (सीडब्ल्यूसी) च्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधताना सोनिया गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“आपल्या समाजातील घटकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासकरुन शेतकरी बांधव, परप्रांतीय कामगार, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापार आणि उद्योग ठप्प झाले आहेत. आणि कोट्यावधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालं आहे,”असं सोनिया गांधी म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – मास्क, सॅनिटायझरवरील जीएसटी हटवा; सीटीआयची मागणी


कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, “आम्ही पंतप्रधानांना वारंवार विनंती केली आहे की चाचणी करणे, रुग्णांना शोधणे आणि अलग ठेवण्याशिवाय पर्याय नाही.” दुर्दैवाने, चाचण्या अजूनही कमी होत आहेत आणि चाचणी किटचा पुरवठाही कमी आहे आणि खराब दर्जाचे आहेत. पीपीई किट क्रमांक आणि गुणवत्ता खराब आहे. कोविड -१९ च्या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी सरकारला दिलेल्या सूचना अंशतः अंमलात आणल्या असल्याचं कॉंग्रेस अध्यक्षा म्हणाल्या.

- Advertisement -

सोनिया गांधी म्हणाल्या की “लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी रोजगार गेले. आर्थिक घडामोडी थांबल्यामुळे बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला या संकटाला तोंड देण्यासाठी किमान ७,५०० रुपये देण्यात यावेत. दरम्यान, त्यांनी डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, अत्यावश्यक सेवा प्रदाता, स्वयंसेवी संस्था या सर्वांचं कौतुक केलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -