गोव्यात आज भाजपची शक्तीपरीक्षा?

गोव्यात आज भाजपची शक्तीपरीक्षा?

गोव्यात आज भाजपची शक्तीपरीक्षा?

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला होता. अखेर सोमवारी रात्री गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आणि प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपकडे पूर्ण संख्याबळ असल्याचे सांगत सावंत यांनी राज्यपालांकडे आज, बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याची अनुमती मागितली आहे. सर्वाधिक आमदारसंख्या असलेला काँग्रेस तसेच सहकारी पक्ष आणि अपक्षांच्या बळावर सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या भाजपची आजच भाजपची होण्याची चिन्हे आहेत.

सावंत यांनी घेतली पर्रीकरांच्या कुटुंबियांची भेट

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी प्रमोद सावंत यांनी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर राभवनात राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सावंत यांच्यासमवेत ११ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. ‘मिरामार किनाऱ्यावर पर्रीकर यांचे स्मृतिस्मारक उभारण्यात येईल’, अशी पहिली घोषणा करीत, सावंत यांनी, ‘पर्रीकर यांच्या सुशासनाच्या मार्गावरुनच आपले सरकार मार्गक्रमण करील’, अशी ग्वाही दिली आहे. यानंतर सावंत यांनी राज्यपालांकडे आज, बुधवारीच विश्वासदर्शक ठराव मांडण्याची परवानगी मागितली.

पर्रीकर आणि भाजप आमदार फ्रान्सिस डिसुझा यांचे निधन, भाजपामध्ये दाखल होण्यासाठी काँग्रेसच्या दोनआमदारांनी दिलेले राजीनामे यामुळे सध्या गोवा विधानसभेचे संख्याबळ ३६ वर आले आहे. १४ आमदार असलेला काँग्रेस सध्या सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र सरकारस्थापनेसाठीचे संख्याबळ भाजपसाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे. भाजपचे १२ आमदार, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार आणि तीन अपक्ष, असे २१ जणांचे संख्याबळ भाजपच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या तरी सावंत सरकारला कोणताही धोका नसल्याचे दिसत आहे.

First Published on: March 20, 2019 9:03 AM
Exit mobile version