सीता मातेविषयी अश्लील भाष्य करणाऱ्या कर्मचाऱ्याला गोएअर कंपनीने केले निलंबित

सीता मातेविषयी अश्लील भाष्य करणाऱ्या कर्मचाऱ्याला गोएअर कंपनीने केले निलंबित

सीता मातेविषयी अश्लील भाष्य करणाऱ्या कर्मचाऱ्याला गोएअर कंपनीने केले निलंबित

खासगी विमान कंपनी गोएअरने आपल्या एका कर्चमाऱ्याला सीता मातेविषयी अश्लील भाष्य केल्याबद्दल काढून टाकले आहे. गोएअर विमान कंपनीचा कर्मचारी आसिफ खान याने सीता मातेबद्दल ट्विटरवर अश्लील भाष्य केलं होतं. ज्यानंतर ट्विटरवर बॉयकॉट गोएअर (#boycottGoair) ट्रेंडमध्ये आलं. नेटकऱ्यांनी गोएअर कंपनीला टॅग करत या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

सोनम महाजनने गोएअर कंपनीला टॅग करू म्हटलं होत की, ‘आसिफ खान आपला कर्मचारी आहे का? जर तो तुमचा कर्मचारी असेल आणि तुम्ही त्याला काढून टाकले नाही तर याचा अर्थ असा होई की, तुम्ही हिंदू धर्माबद्दल द्वेष वाढवत आहात.’

गोएअर कंपनीने या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी अनेक लोकं मागणी करू लागले. लोकांनी सांगितलं की, ‘जर गोएअर कंपनीने या कर्मचाऱ्याला काढलं नाहीतर ते गोएअर मधून पुढचा प्रवास करणार नाही.’

त्यानंतर गोएअर कंपनीने आसिफ खानला काढून टाकले. याबाबत ट्विटरवर शेअर करताना लिहिलं का, ‘गोएअरच्या झिरो टॉलरन्स पॉलिसीनुसार गोएअरच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीने नियुक्तीचे नियम, अटी आणि धोरणे पाळणे अनिवार्य आहे. यामध्ये सोशल मीडियावरील वर्तनाची देखील समावेश आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा कर्मचाऱ्याचे वैयक्तिक दृष्टीकोन कंपनीशी संबंधित नाहीत. प्रशिक्षणार्थी प्रथम अधिकारी आसिफ खानचा कररा तात्काळ रद्द करण्यात येत आहे.’

गोएअर कंपनीच्या या घोषणेनंतर सोनम महाजन यांनी ट्विट केलं की, ‘माझ्या ट्विटनंतर आसिफ खानने त्याचे प्रोफाइल डीएॅक्टिव्हेट केलं आहे. पण आनंद आहे की गोएअरने त्याच्यावर कारवाई केली.’


हेही वाचा – Coronavirus: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण


 

First Published on: June 5, 2020 7:03 PM
Exit mobile version