Gold Jewelley : एक व्यक्ती किती सोनं स्वत:कडे ठेवू शकते? जाणून घ्या केंद्राचा कायदा

Gold Jewelley : एक व्यक्ती किती सोनं स्वत:कडे ठेवू शकते? जाणून घ्या केंद्राचा कायदा

Gold Jewelley:एक व्यक्ती किती सोनं स्वत:कडे ठेवू शकते? जाणून घ्या केंद्राचा कायदा

एखाद्या शुभप्रसंगी सोने खरेदी करणे हे भारतीय कुटुंबांमध्ये शतकानुशतके चालत आलेली जुनी परंपरा आहे. परंतु ही सोने खरेदी काही लोक वैयक्तिक वापरासाठी करतात तर काही लोक गुंतवणूकीसाठी. याशिवाय धनोत्रयदशी, दिवाळी, अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तांवर खोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, परंतु भारतात एक व्यक्ती स्वत: जवळ किती सोनं ठेवू शकते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या याबाबत केंद्राचा काय कायदा आहे.

एखाद्या व्यक्तीकडे प्रमाणापेक्षा अधिक सोन्याची मालमत्ता असल्यास आयकर विभागातर्फे चौकशी केली जाऊ शकते. त्यामुळे गोल्ड होल्डिंग कायद्यांविषयी माहिती असणे महत्त्वाचे आहे. यावर आयकर तज्ञांनी असे मत व्यक्त केले की, जर सोन्याचा स्त्रोत कायदेशीर असेल आणि एखाद्याच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. परंतु आयकर अधिनियम, १९६१ कलमातील १३२ नुसार, कर अधिकाऱ्यांच्या तपासात, जर एखाद्या व्यक्तीकडील सोन्याचे कोणतेही दागिने किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचा मुख्य स्त्रोताची माहिती नसेल किंवा त्यासंबंधीत वैध्य कादगपत्रे नसतील तर ते दागिने जप्त केले जाऊ शकतात.

आयकर विभागाच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने ठेवलेल्या सोन्याचा सोर्स वैध्य असेल आणि त्यांचे स्पष्टीकरण योग्यरित्या दिले गेल्यास कितीही सोनं ती व्यक्ती स्वत:जवळ बाळगू शकते. आपण असे सोने विकत घेतल्यास ज्याची ओरिजनल इनवॉइस दाखवू शकता. किंवा आपल्या कुटूंबाकडून सोन्याचा वारसा मिळाला असेल तर आपण इच्छेची किंवा कौटुंबिक सेटलमेंट अधिकृत कागदपत्रं दाखवू शकता. भेटवस्तू म्हणून मिळालेले सोन्याचे दागदागिने आपण गिफ्ट डीड ( GIFT DEED) म्हणून दाखवू शकता.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) १ डिसेंबर २०१६ रोजी एका प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले होते की, सोन्याच्या दागिने बाळगण्याची कोणताही मर्यादा नाही. परंतु ते सोने तुम्ही अधिकृत स्रोतांकडून मिळवलेले असले पाहिजे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कितीही प्रमाणात सोने ठेवू शकते, जर त्याचा स्त्रोत अधिकृत असेल तर. परंतु कर प्राधिकरणास घरातील किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची अधिकृत स्त्रोत (दुकान किंवा कुठून मिळाले याची माहिती) शोधण्याचा किंवा त्याविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कोणत्याही आयकर विभागाच्या चौकशीत काही गैर आढळल्यास कर अधिकारी संबंधीत सोन्याचे दागिने जप्त करू शकतात. जर ते सोने आयकर रिटर्नमध्ये सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाच्या पातळीशी जुळत नसल्यास जप्त होऊ शकते.

वित्त मंत्रालयाने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की, एका मर्यादेखाली असलेले दागिने जप्त केले जाणार नाहीत, जरी ते निर्धारकाच्या उत्पन्नाच्या रेकॉर्डशी जुळते नसले तरी. ही मर्यादा खालीलप्रमाणे आहे – विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅम, अविवाहित महिलांसाठी 250 ग्रॅम आणि पुरुष सदस्यांसाठी 100 ग्रॅम.


 

First Published on: June 21, 2021 10:27 PM
Exit mobile version