सोनं खरेदीबद्दल नवा नियम; नाही पाळल्यास होईल शिक्षा!

सोनं खरेदीबद्दल नवा नियम; नाही पाळल्यास होईल शिक्षा!

दिवाळीच्या मुहूर्तावर १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील एवढे पैसे

लग्नसराईच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र, आता जर तुम्ही सोन्याची खरेदी करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण, केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांबद्दलचा एक नवा नियम जाहीर केला आहे. आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. त्या दागिन्यामध्ये किती शुद्ध सोने वापरले गेले हे या हॉलमार्कमुळे कळू शकणार आहे. यासाठी सराफांना लायसन्स देखील दिले जाणार आहेत.

नियम पाळा नाहीतर शिक्षा

देशभरात २३४ जिल्ह्यांमध्ये ८९२ हॉलमार्किंग केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या हॉलमार्किंगचा नियम पाळला नाही १ वर्षाचा तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. मात्र, ग्रामीण भागातल्या सराफांना यातून सूट देण्यात आली आहे. तिथे अजून हॉलमार्किंगची केंद्र व्हायची आहेत. त्यासाठी अजून १ वर्ष लागेल, अशी माहिती समोर आली आहे.

देशात सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करणे याआधी ऐच्छिक होते. हा नियम लागू झाल्यानंतर सगळ्या सराफांना दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्किंग करणे सक्तीचे झाले. दरम्यान, याआधी सोन्याची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे ग्राहकांना कमी गुणवत्तेचे सोनेही विकले जात होते आणि पैसे मात्र, शुद्ध सोन्याचे घेतले जायचे. मात्र, आता या नव्या नियमामुळे शुद्ध सोन्याची ओळख होणार असून ग्राहकांची फसवणूक देखील होणार नाही.


हेही वाचा – चोर करणार होता प्लास्टिक सर्जरी, पण…


 

First Published on: January 15, 2020 12:56 PM
Exit mobile version