Gold Price Today: सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

Gold Price Today: सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

Gold Jewelley:एक व्यक्ती किती सोनं स्वत:कडे ठेवू शकते? जाणून घ्या केंद्राचा कायदा

या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याच्या किमतीने गेल्या एक वर्षातली निचांकी पातळी गाठली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे. मंगळवारी रात्री जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंची विक्री संपवण्याच्या अनुषंगाने दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर बुधवारी ४९ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ४३ हजार ९२५ रुपयांवर गेले आहेत. मागील व्यापार सत्रामध्ये सोन्याचे दर प्रति ग्रॅम ४३ हजार ९७४ रुपयांवर बंद झाले होते.

चांदीच्या दरात ३३१ रुपयांची घसरण होऊन ६२ हजार ४४१ रुपये प्रति किलोग्राम झाले आहे. मागील व्यापार सत्रात चांदी ६२ हजार ७७२ रुपये प्रति किलोग्राम रुपयांवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्योरिटीजीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, अमेरिकेच्या आर्थिक सुधार होण्याच्या आशेने डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.

Good Returns वेबसाइटनुसार, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किमत ४३ हजार ३७० रुपये आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किमत ४४ हजार ३७९ झाली आहे. चांदीचे दर १ किलोग्रॅम ६३ हजार ६०० झाले आहेत.


हेही वाचा – आजपासून ग्राहकांच्या खिशाला झळ, मोबाईल, वाहनांचे दर अन् विमान प्रवासही महागणार


 

First Published on: April 1, 2021 3:50 PM
Exit mobile version