सुरतमध्ये ‘पबजी’वर बंदी, खेळताना आढळ्यास होणार कारवाई

सुरतमध्ये ‘पबजी’वर बंदी, खेळताना आढळ्यास होणार कारवाई

भारतात पबजीचे नवे अपडेट, तर प्राइम सेवा लाँच

भारतात ‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) गेम तरूणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्स आता जिवघेणे ठरत आहेत. या खेळांनी आता मनोरंजनाच्या सीमा ओलांडल्या असून त्यांचा अतिरेक आता जीवावर बेताना दिसत आहे. तसेच या खेळाचे अनेक दुष्परिणाम आतापर्यंत समोर आले असून अनेक तरूणांमध्ये या खेळामुळे हिंसक भावना वाढीस लागत आहे. विद्यार्थांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आता सुरक्षेच्या दृष्टीने पबजी गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोटनंतर आता सुरतमध्येही पबजीवर बंदी घालण्यात आली आहे.

पबजी खेळणाऱ्यांवर होणार कारवाई

पबजी हा गेम तरुणांमध्ये मोठ्या संख्येने खेळला जात असून हा गेम खेळाऱ्या तरुणांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने राजकोटमध्ये या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. आता राजकोटनंतर भावनगर येथे देखील पबजी खेळण्यास बंदी घालण्यात आली असून, असे आदेशदेखील सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत.

अशी होणार कारवाई

सरकारने दिलेल्या आदेशानुसार, जर कोणी पबजी गेम खेळताना दिसलं तर त्याच्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे. त्या व्यक्तीवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या गेम्समुळे मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या आहेत. तसेच याचा परिणाम त्याच्या शालेय जीवनावर होत असल्याच्या अनेक तक्रारी नॅशनल कमिशन फॉर प्रोटक्शन ऑफ चाईल्ड राईट्सकडे दाखल करण्यात आल्या आहे. त्यामुळे या गेम्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पबजीनंतर या गेमवर देखील बंदी

PUBG गेमनंतर Momo Challenge या गेमवर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच पबजी गेम करता जो नियम करण्यात आला आहे. तो नियम मोमो चॅलेंजकरता देखील करण्यात आला आहे. त्यामुळे पबजीनंतर आता जिवघेण्या अशी मोमो चॅलेंज गेमवर देखील बंदी घालण्यात आली आहे.


वाचा – भारताने ताकीद दिल्यानंतर ‘पबजी’ गेमची माघार

वाचा – धक्कादायक…’पबजी’च्या नादात प्यायला ‘हे’


 

First Published on: March 12, 2019 10:17 AM
Exit mobile version