Coronavirus: देशात रुग्णांच्या रिकव्हरीचे वाढले प्रमाण!

Coronavirus: देशात रुग्णांच्या रिकव्हरीचे वाढले प्रमाण!

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात कोरोना विषाणूची फैलाव सातत्याने वाढत आहेत. दरम्यान सरकारी आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की, केवळ ६.३९ टक्के अॅकिव्ह कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे. देशातील कोरोना विषाणूचा फैलाव इतर देशांच्या तुलनेत कमी आहे, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सध्या देशात केवळ ०.४५ टक्के प्रकरणांमध्ये व्हेंटिलेटरची आवश्यकता असते.

बुधवारपर्यंत जवळपास तीन टक्के प्रकरणांमध्ये गहन उपचार दिले जात होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण वाढले आहे. मार्च अखेरस हा दर ७.१ टक्के होता, तो सध्या वाढून ३९.६२ टक्के झाला आहे. ते पुढे म्हणाले की, ४० हजारहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत आणि जागतिक आकडेवारीच्या तुलनेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. सोमवारपासून दररोज सुमारे एक लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जात असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १३ हजार ३२१वर पोहोचला आहे. त्यापैकी ३ हजार ४५६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजारहून अधिक आहे.


हेही वाचा – Coronavirus: हाताला ‘झिणझिण्या’ आणि ‘वेदना’ होणे कोरोनाचे नवे लक्षणं!


 

First Published on: May 21, 2020 5:46 PM
Exit mobile version