घरताज्या घडामोडीCoronavirus: हाताला 'झिणझिण्या' आणि 'वेदना' होणे कोरोनाचे नवे लक्षणं!

Coronavirus: हाताला ‘झिणझिण्या’ आणि ‘वेदना’ होणे कोरोनाचे नवे लक्षणं!

Subscribe

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती वातावरण वाढत आहे. दरम्यान अमेरिका, इटली आणि ब्रिटन सारख्या देशाच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमधून चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा फैलाव सुरू झाला. तेव्हा जागातिक आरोग्य संघटनेने ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणे सांगितले होते. परंतु काही वेळानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आणि विषाणूची नवीन लक्षणे समोर आली. अलीकडेच कोरोनाचे आणखी एक आश्चर्यचकित करणारे लक्षण समोर आले आहे. ज्यास पॅराथिसिया म्हटले जाते.

ताप, खोकल, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव इत्यादी कोरोनाची लक्षणे आहेत. तर काही आठवड्यांपूर्वी चव आणि गंध न घेता येणे हे कोरोनाचे लक्षण असल्याचे म्हटले गेले. याव्यतिरिक्त काही रुग्णांच्या मेंदूवर परिणाम झाल्याचे देखील समोर आले. ब्रिटनच्या एका अहवालानुसार, हातामध्ये वेदना होणे आणि हाताला झिणझिण्या येणे हे देखील कोरोनाचे सुरुवातीचे लक्षण असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

या अहवालानुसार इंग्लंडमधील कोरोना रुग्णांना हाताला झिणझिण्या येणे आणि वेदना होण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही रुग्णांच्या मते त्यांना विजेचा झटका बसल्यासारखे वाटते आणि नंतर संपूर्ण शरीरावर झिणझिण्या आल्यासारखे वाटते. एका रूग्णाने सांगितले की, त्याच्या हातात झिणझिण्या येणे हेच कोरोना विषाणूचे पहिल्यापासूनचे लक्षण आहे. या नवीन लक्षणांचे नाव पॅराथिसिया आहे आणि यामध्ये सुई किंवा पिन टोचल्या सारख्या वेदना होत असतात.

न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई डाउन टाऊन येथे संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण संचालक डॉ. वलिद जावेद यांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील कोरोना विषाणू विरोधात इम्यून सिस्टमच्या प्रतिक्रियेमुळे ही लक्षण जाणवू लागतात.

- Advertisement -

जेव्हा विषाणू शरीरात प्रवेश करतात तेव्हा रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात. यामुळे शरीरात केमिकल्स तयार होतात, ज्यामुळे झिणझिण्याआल्यासारखे वाटते. डॉ. जावेन यांच्या मते, इतर आजारातही असे अनुभव आले आहेत.

कोरोना रुग्णांना सुद्धा सुई आणि पिन टोचल्या सारख्या वेदना झाल्याचा अनुभव आला आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेह आणि ऑटोइम्यून कंडिशनवाल्या लोकांना अशा वेदना होण्याची शक्यता जास्त असते. सध्या लक्षणांमागील नेमके कारण सांगणे कठीण आहे. परंतु तज्ज्ञांचे मत आहे की, हे बहुतेक वेळेस रक्क भिसरण किंवा नसावर पडलेल्या दबावामुळे होते.


हेही वाचा – Coronavirus: …यामुळे १० मिनिटांत तुम्हाला होऊन शकतो कोरोना!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -