आता इंटरनेट सुसाट चालणार!

आता इंटरनेट सुसाट चालणार!

आपल्या हातात असलेल्या मोबाईलवर किंवा घरातल्या कम्प्युटरवर इंटरनेटचा स्पीट कमी असला, की आपण सर्व्हिस प्रोव्हायडरला किंवा मोबाईलच्या प्रॉब्लेमला दोष देतो. पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने भारतीयांच्या इंटरनेट स्पीडवर तुफान पर्याय शोधून काढला आहे. इस्रोने मंगळवारी मध्यरात्री म्हणजेच बुधवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास जीसॅट-११ हा उपग्रह युरोपियन अवकाश संशोधन केंद्राच्या गुएना तळावरून अवकाशात सोडला. दक्षिण कोरियाच्या जिओ कॉम्पसेट २-ए या उपग्रहासोबत जीसॅट-११चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.


हेही वाचा – इस्त्रोने केले सर्वात जास्त वजनदार उपग्रहाचे प्रक्षेपण

कसा वाढेल इंटरनेटचा स्पीड?

जीसॅट-११ उपग्रह हा मुळातच ब्रॉडबँडची वेगमर्यादा वाढवण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आला आहे. याचे सोलर पॅनलच तब्बल ४ मीटर इतके लांब आहेत. त्यामुळे एक तर ब्रॉडबँड स्पेशालिटीमुळे भारतात १०० जीबी प्रतिसेकंद इतका इंटरनेट स्पीड मिळू शकणार आहे. आणि दुसरं म्हणजे या उपग्रहाचा आवाका जास्त असल्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटची सुविधा पोहोचवणं शक्य होणार आहे. अगदी ग्रामीण भारतातल्या, दुर्गम भागातल्या ग्राम पंचायत देखील यामुळे इंटरनेटवर कनेक्ट होऊ शकणार आहेत. भारताच्या डिजिटल इंडिया प्रोग्रॅमचा एक भाग असलेल्या भारत नेट प्रोजेक्टच्या अंतर्गत हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे.


हे तुम्ही वाचलंत का? – इस्त्रो अवकाशात सोडणार ३० उपग्रह

कसा आहे जीसॅट-११?

जीसॅट-११च्या इतर तांत्रिक बाबींपेक्षाही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे सोलर पॅनल. या पॅनलची लांबी ही इतर सामान्य उपग्रहांपेक्षा जास्त म्हणजेच साधारण ४ मीटर आहे. त्यामुळे त्याच्या ब्रॉडबँडचा आवाका वाढल्यामुळे अधिका जास्त भूभागावर हायस्पीड इंटरनेट सुविधा पुरवता येणार आहे. सुमारे ५ हजार ८०० किलो वजनाचा हा उपग्रह एरियाने ५ व्हीए-२४६ या प्रक्षेपकातून हा उपग्रह सोडण्यात आला. पृथ्वीच्या भूभागापासून सुमारे ३६ हजार किलोमीटरवर पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेच्या बाहेर हा उपग्रह स्थिरावणार आहे.

इथे पाहा जीसॅटच्या प्रक्षेपणाचा संपूर्ण प्रवास!

First Published on: December 5, 2018 12:40 PM
Exit mobile version