नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरब्याला गुजरातमध्ये गालबोट; तुफान दगडफेकीत 6 जण जखमी

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरब्याला गुजरातमध्ये गालबोट; तुफान दगडफेकीत 6 जण जखमी

नवरात्रोत्सवानिमित्त देशभरात गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वंत्र मोठ्या उत्साहान आणि आनंदात गरबा-दांडिया खेळला जात आहे. मात्र, उत्साहाच्या वातावरणाला गुजरातमध्ये गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातमधील खेडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात झालेल्या दगडफेकीत झाली असून, यामध्ये 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहेत. (Gujarat Stones pelted during Navratri celebrations in Kheda;6 people got injured)

गुजरातमधील उंधेला या गावात सोमवारी रात्रीच्या सुमाराह दगड फेकीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील प्रमुखांनी हा गरबा कार्यक्रम आयोजित केला होता. येथून जवळच मंदिर आणि मशीद आहे. कार्यक्रम सुरु होण्याआधी काही लोकांनी येऊन तो बंद करण्यास सांगितले. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. त्यावेळी या दगडफेकीत 6 जण जखमी झाले.

उंधेला गावात नवरात्री साजरी होत असताना आरिफ आणि जाहीर यांनी काही जणांसोबत मिळून गोंधळ घातला. त्यानंतर त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत 6 जण जखमी झाल्याची माहिती डीएसपी राजेश गाधिया यांनी दिली आहे.

दगडफेक झाल्याची माहिती मिळताच डीएसपी राजेश गाधिया आणि क्राइम ब्रांचचं पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी सध्या पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


हेही वाचा – ‘मी दोन्ही मेळाव्यांची भाषणं ऐकणार नाही’ म्हणत फडणवीसांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

First Published on: October 4, 2022 10:52 AM
Exit mobile version